आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार खूनप्रकरणी जालन्यात चार जणांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- शहरातील शनिमंदिरजवळील गवळी मोहल्ल्यात झालेल्या पत्रकार खूनप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गुरुवारी रात्री 10 वाजेदरम्यान विठ्ठलसिंग गुलाबसिंग राजपूत (40, साळीगल्ली, शनिमंदिरजवळ, जुना जालना) यांना 4-5 जणांनी मिळून धारदार शस्त्राने वार करून मारले होते. याप्रकरणी कैलास सिताराम शिंदे (32, आनंदीस्वामी गल्ली, जुना जालना) यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री तीन तर शुक्रवारी एकास अटक केली. सुनील रामेश्वर सोनार (19, साळीगल्ली), अकबर खान युसूफ खान (24, दु:खी नगर), शेख अन्वर शेख बाबर (21, मणियार गल्ली), नितीन मदन हेलगट यांना न्यायालयाने 26 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.