आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसहभागातून "के-क्लास' सुरू, प्रोजेक्टरद्वारे गिरवले जात आहेत धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मठपिंपळगाव - अंबड तालुक्यातील हरतखेडा येथील ग्रामस्थ व शिक्षकांनी दीड लाख रुपयांची लोकवर्गणी करून जिल्हा परिषद शाळेत के-क्लास सुरू केला आहे. या क्लासचे उद्घाटन बुधवारी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

हरतखेडा येथे िजल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असलेली शाळा अाहे. या शाळेत एकूण २३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील िवद्यार्थ्यांना त्या-त्या वर्गाच्या पाठ्यक्रमाची माहिती ऑडिआे तसेच व्हिडिआे म्हणजेच डिजिटल स्वरूपात पाहण्यास मिळावी व त्यांची आकलनशक्ती वाढावी या दृ़ष्टिकोनातून शाळेतील शिक्षकांनी के-क्लास सुरू करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी शिक्षकांनी ग्रामस्थांसमोर के-क्लास सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. िवद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे लक्षात घेऊन ग्रामस्थांनीही तत्काळ होकार दिला अन् तत्काळ २८ हजार रुपयांचा निधी जमा झाला. त्यानंतर दिवसेंदिवस ग्रामस्थांनी आपापल्या क्षमतेनुसार के-क्लाससाठी वर्गणी दिली. तीन महिन्यांत शिक्षक व ग्रामस्थांनी एकूण दीड लाख रुपये जमा केले. या लोकवर्गणीतून के-क्लास उपक्रम शाळेत सुरू करण्यात आला. बुधवारी जिल्हा परिषदेचे सीईआें डॉ.अशोक कोल्हे यांच्या हस्ते के-क्लासचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बागू राठोड, संजय गावडे, अंबडचे गटविकास अधिकारी बनसोड, डायटच्या प्राचार्या अचला जडे, मंगल धुपे यांची उपस्थिती होती.

प्राेजेक्टरद्वारे शिक्षण
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञानाची माहिती के-क्लासच्या माध्यमातून प्राेजेक्टरद्वारे समजावून सांगण्यात येणार आहे. के-क्लास हा ई-लर्निंग क्लासचे अॅडव्हान्स व्हर्जन आहे. प्राेजेक्टर पेनच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना लिहिताही येईल तसेच गणिते सोडविणे, विविध ज्ञानाचे खेळही खेळता येणार आहेत.