आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर आॅलिम्पिकच्या मैदानात कबड्डीचा डाव!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- कबड्डीचाप्रेक्षक-प्रेमी वर्ग वाढतो आहे. गेल्या वर्षी १६ मिलियन्स लोकांनी कबड्डीला पसंती दिली. त्यामुळे कबड्डीसाठी ऑलिम्पिकचे दरवाजेही उघडू शकतात. कबड्डी प्रो लिग त्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरतो आहे. कधीकाळी धुळ्यातील मातीत खेळ रंगवणारा १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो लिगमधील बेंगॉल वॉरियर्सचा खेळाडू महेंद्र राजपूत याबद्दल सांगत होता. कबड्डीमधील त्याच्या योगदानाबद्दल त्याला राज्य कबड्डी असोसिएशनचा उत्कृष्ट खेळाडू पुरस्पस्कार जाहीर झाला आहे. कबड्डी दिनानिमित्त महेंद्रशी साधलेला हा संवाद.

कबड्डीच्या निर्माण होत असलेल्या ‘ग्लोबल इमेज’बद्दल महेंद्र राजपूत बोलत होता. कबड्डीला आता सुगीचे दिवस येऊ पाहत आहे. भारतापाठोपाठ इतर देशातील खेळाडूही कबड्डीच्या मैदानात उतरत आहे. तर दुसरीकडे ऑलिम्पिकसाठी प्रयत्न सुरू आहे. ऑलिम्पिक क्रीडा समितीच्या निकषानुसार किमान ७२ देशांचा सहभाग असला पाहिजे. हा आकडा आता प्रतिवर्षी वाढतो आहे. जगातील ५६ देश कबड्डीकडे आकृष्ट झाले आहेत. भारतापाठोपाठ आशिया खंडातील पाकिस्तान, श्रीलंकेमध्येही कबड्डीची ‘क्रेझ’ वाढते आहे. आपल्या संघात असलेले दोन काेरियन, एक पाकिस्तानी एक श्रीलंकन खेळाडू यांच्याशी बोलताना ते मला सहजपणे जाणवते. त्यामुळे इतर देशात लोकप्रिय होत असलेल्या भारतीय कबड्डीबद्दल मला आपसूकच अभिमान वाटतो.

राज्याचा विचार करता खान्देशात अजूनही अनेक उदयाेन्मुख खेळाडू आहेत. संधी मिळाली तर त्यांना मार्गदर्शन करण्यासही मागे हटणार नाही. सर्वसाधारण परिस्थिती असताना कबड्डीनेच आज नवीओळख दिली. खेळाच्या बळावर सन २०१० मध्ये धुळे एसआरपीमध्ये भर्ती झालो; परंतु राज्य राखीव पोलिस दलानेही खेळासाठी सतत सहकार्य करत प्राेत्साहान दिले. आजवर व्यावसायिक संघ, विद्यापीठ, राज्यस्तर आता राष्ट्रीय स्तरावर लढतो आहे. कबड्डीची क्रेझ वाढत गेल्यामुळेच तिची ग्लोबल इमेज तयार झाली असल्याचे राज्य कबड्डी असोसिएशनचा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार जाहीर झालेला महेंद्र सांगतो. उद्या बुधवारी जालना येथे या पुरस्काराचे वितरण हाेणार आहे. मानाचा मानला जाणारा हा पुरस्कार प्राप्त करणारा महेंद्र पहिलाच खेळाडू आहे हे विशेष.

घराला ‘कबड्डी’चे नाव
आपल्याखेळाविषयी असलेल्या प्रेमामुळेच महेंद्र याने आपल्या घराला नावही कबड्डी असेच दिले. कबड्डीसाठी सतत बाहेर असलेल्या महेंद्र याला मात्र कुटुंबीयांना वेळ देणे कठीण झाले आहे. दोन दिवस घरी आल्यावरही सायंकाळी चुकता क्युमाईन क्लबला जातो, असे तो सांगतो. तर त्याचे पालक आपल्या मुलाचा लौकिक पाहून अभिमानाने कबड्डीच्या मातीला सर्व श्रेय देतात.

यांचे मानले आभार...
धुळेजिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, राज्य सहकार्यवाह मुजफ्फर सय्यद, मनोहर चौधरी, रवी देसर्डा, संदीप पाटोळे, जयहिंद क्रीडा मंडळाचे पदाधिकारी जितेंद्र ठाकरे, नीलेश देसले, मनीष मासोळे, जितेंद्र सपकाळ, देवेंद्र शिरसाठ यांनी पदोपदी मार्गदर्शन केले. त्यामुळे कोलकाता येथील शिबिरात असूनही महेंद्र राजपूत यांची नावे घेण्यास विसरत नाही.
बातम्या आणखी आहेत...