आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारकीच्या रिंगणात कैलास चिकटगावकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी पक्षनिरीक्षकांसमोर घातलेल्या गदारोळात येथील माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर सर्मथकांनी त्यांची उमेदवारी निश्चित होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे.

औरंगाबाद येथे गांधी भवनात पक्षनिरीक्षक मुजफ्फर हुसेन, धोंडिराम राठोड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत वैजापूरचे माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर यांची मुलाखत शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या वेळी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे, तालुकाध्यक्ष भगवान तांबे, काळू पाटील, मंजाहरी गाढे, चंद्रकांत गायकवाड आदी चिकटगावकर सर्मथकांनी पक्षनिरीक्षकांना उमेदवारी देण्याची गळ घातली.

उमेदवारी मिळल्याचा दावा : महायुतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांचा विजयाचा अश्वमेध रोखण्यासाठी माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर सहजपणे मात करणारे उमेदवार ठरतील, असा दावा त्यांच्या सर्मथकांनी केला आहे. वैजापूर, गंगापूर, कन्नड या मतदारसंघात त्यांचा प्रभाव परिणामकारक ठरेल, असा विश्वास चिकटगावकर सर्मथकांनी केला आहे.

भांडकुदळपणा संस्कृती नाही
पक्षनिरीक्षकांसमोर माजी खासदार उत्तमसिंह पवार व माजी आमदार नितीन पाटील सर्मथकांनी उमेदवारी मिळावी म्हणून केलेली हाणामारी ही कॉँग्रेस पक्षाची संस्कृती नसल्याची टीका कैलास पाटील यांनी केली. या वेळी घोषणाबाजी करून गदारोळ करणारे लोक हे दोन्ही नेत्यांनी पैसे देऊन आणले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

रामकृष्ण बाबा पाटील मदत करतील काय?
कैलास पाटील चिकटगावकर यांचे राजकीय हाडवैरी असलेले माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील हे लोकसभा निवडणुकीत चिकटगावकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणुकीच्या फडात सहकार्याची भूमिका वठवतील का, या प्रश्नावर चिक टगावकर सर्मथकांनी मौन बाळगले. दोन महिन्यांपूर्वीच कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांच्या उमेदवारीवरून दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला होता.