आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालिका माता मंदिराची दानपेटी चोरट्यांनी फोडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फर्दापूर - अजिंठा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या सुप्रसिद्ध कालिका माता मंदिरातील दानपेटी फोडल्याची घटना मंगळवारी (5 ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली.

फर्दापूरपासून 3 किलोमीटर अंतरावर पर्वतरांगेच्या कुशीत कालिका देवीचे मंदिर आहे. दर मंगळवार व शुक्रवारी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. नित्यनियमाप्रमाणे मंदिराचे विश्वस्त अनिल रावलकर व त्यांचे सहकारी मंगळवारी सकाळी मंदिरात गेले असता त्यांना मंदिराच्या दाराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी पाहणी केली असता मंदिराची दानपेटी फोडून दानपेटीतील देवीचा चांदीचा मुकुट व कंबरपट्टा असा एकूण 5 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असल्याचे निदर्शनास आले. या चोरीच्या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. पंधरा ते वीस दिवसांपूर्वी याच मंदिरासमोरील चंदनाचे झाडदेखील चोरट्यांनी रातोरात चोरून नेले होते.
या सर्व प्रकारावरून परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असल्याचे दिसते. ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संध्याकाळपर्यंत मंदिराच्या विश्वस्तांकडून या घटनेबाबत कुठलीही तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेली नव्हती.