आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्पना गिरी प्रकरण; चौथा आरोपी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर शहर युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कल्पना गिरी खूनप्रकरणी मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

प्रभाकर शेट्टी असे चौथ्या आरोपीचे नाव आहे. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. शेट्टी हा गिरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी महेंद्रसिंग चौहान यांच्या मालकीची अश्वमेघ व नर्तकी ही दोन हॉटेल्स चालवतो. घटनेनंतर शेट्टी फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके नियुक्त केली होती. कर्नाटकातील काही गावांत त्याचा शोध घेण्यात आला होता. परंतु तो हाती लागत नव्हता. अखेर लातुरातच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चार दिवसांपूर्वी लातुरातीलच र्शीरंग ठाकूर या तिसर्‍या आरोपीला अटक करण्यात आली होती. ठाकूर व शेट्टीवर खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

21 मार्च रोजी कल्पना गिरीला तुळजापूरजवळील पाचुंदा तलावात ढकलून तिचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आठवडाभराने शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष महेंद्रसिंग चौहान व त्याचा मित्र समीर किल्लारकर यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.