आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरदेवाने नववधूला नेले हेलिकॉप्टरमधून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड - कन्नड तालुक्यातील मकरणपूर येथे रविवारी (23 फेब्रुवारी) नवरदेव चक्क हेलिकॉप्टरने आला. लग्न झाल्यानंतर तो नववधूला घेऊन हेलिकॉप्टरनेच घरी परत गेला. त्यामुळे कन्नड शहरासह मकरणपूरमध्ये याविषयी जोरदार चर्चा दिवसभर ऐकावयास मिळत होती.

हेलिकॉप्टरला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. वाळूज येथील व्यावसायिक शेख हुसेन शेख सांडू यांचा मुलगा शेख मोहसीन याचा विवाह कन्नड येथील फैय्याज शेरखाँ पटेल यांच्या फरजाना या मुलीशी रविवारी झाला.

मोहसीन शेख याचे वडील शेख हुसेन यांची इच्छा होती की, आपल्या मुलाच्या लग्नाला हेलिकॉप्टरने जावे. त्यासाठी त्यांनी पुणे येथील सिल्व्हर ज्युबिली आर 44 हे हेलिकॉप्टर ताशी 80 हजार रुपये भाड्याने आणले होते. मात्र, त्यांनी ते एक महिना अगोदरच बुक केले होते. रविवारी सकाळी 8.30 वाजता हेलिकॉप्टर वाळूज येथून निघून ते 15 मिनिटांत मकरणपूरला पोहोचले. लग्न मंडपाच्या शेजारीच मोठा हेलिपॅड तयार करण्यात आला होता.