आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबीसीचा माजलगावकरांना कोट्यवधीचा गंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - केबीसीने माजलगाव तालुक्यातील 153 जणांना अधिक पैशांचे अमिष दाखवत सुमारे चार कोटींना गंडवल्याचे उघड झाले. 83 जणांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नाशिक येथे चार वर्षापूर्वी के.बी.सी. गु्रप ऑफ कंपनी श्रीरामनगर आडगावनाका नाशीक या नावाने भाऊसाहेब छबू चव्हाण याने सुरुवात केली. यामध्ये त्याने त्याची आरती भाऊसाहेब चव्हाण संचालक, साधना भाऊसाहेब चव्हाण, नानासाहेब छबू चव्हाण, कविता नानासाहेब चव्हाण व मुख्य मार्गदर्शक छबूराव चव्हाण यांनी संचालक मंडळ स्थापन केले. या कंपनीमध्ये संजय वामनराव जगताप (व्यवस्थापक), संदीप यशवंतराव जगदाळे (वरिष्ठ लिपिक) व वामन गणपत जगताप यांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केली. सुरुवातीला 17 हजार 200 रुपये भरा व तिप्पट पैसे मिळवा असे अमिष दाखवत त्यांनी रिझर्व्ह बॅँकेचे चेक दिले. काही गुंतवणूकदारांना पैसे मिळाल्यानंतर त्या कंपनीने ही योजना पुढे वाढवत 17 हजार 200 वरुन 51 हजार रुपये केली. त्यानंतर रक्कमेत वाढ करून गुंतवणुक करणाºयांना नागरिकांना फसवले. कंपनी गाशा गुंडाळल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

या गुतवणूकदारांनी केली तक्रार
रणधीर गावडे (9 लाख 15 हजार 600), बाबूराव घागरे ( 10 लाख 51 हजार 200), उदय गव्हाणे (5 लाख 58 हजार ), प्रभाकर धोंगडे (आठ लाख 42 हजार 820), चिंतेश जोशी (2 लाख 6 हजार 400), राहुल धोंगडे (2 लाख 86 हजार), रफिक वाहेद शेख (3 लाख 44 हजार) यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.

दिंद्रूड ठाण्यातही नोंद
माजलगाव शहर पोलिस ठाण्यात 40 गुंतवणूकदारांनी आपली एक कोटी 70 लाख, तर ग्रामीण पोलिस ठाण्यात 15 जणांनी 71 लाख 78 हजार रूपयांची नोंद झाली असून दिंद्रूड पोलिस ठाण्यात 28 जणांनी 1 कोटी 36 लाख असे 3 कोटी 80 नोंदणी करण्यात आली आहे.

तपास वर्ग होणार
आमच्याकडे 40 जणांनी केबीसी कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे.’’
अन्वर खान, पोलिस निरीक्षक, माजलगाव शहर ठाणे.