जालना - सध्या भारतीय जनता पक्षाला समाजामध्ये मोठी अनुकूलता आहे. त्याच्या आधारे पक्षाच जनाधार वाढवला पाहिजेत. भाजप सर्वात मोठा पक्ष बनला असून पक्षाचे काम राज्यात आणखी पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या हिमतीवर भाजपला महाराष्ट्रात अग्रेसर ठेवणार असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त शहरातील वृंदावन हॉल येथे रावसाहेब दानवे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह, आ. अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे, जि.प.अध्यक्ष तुकाराम जाधव आदींची उपस्थिती होती.