आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भगवानगडाचा वाद चिघळला: आता महंतांचीही ऑडिओ धमकी; म्हणाले- फाडून खाईन एखाद्याला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी/ बीड - भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे गडाचे मठाधिपती महंत नामदेवशास्त्री यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. ‘नामदेवशास्त्रींचे काय करायचे ते दसऱ्यानंतर पाहू,’ अशी धमकावणीची पंकजांची कथित ऑडिओ क्लिप जारी झाल्यामुळे राजकीय वादंग उठले आहे. पकंजा सत्तेचा दुरुपयोग करून दहशत निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केली असतानाच शनिवारी नामदेवशास्त्री यांचीही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामध्येही त्यांनी धमकीचीच भाषा वापरली असून ‘आमची ताकद एवढी आहे ना, की एखाद्याला मी फाडून खाईन.,’ असे ते या क्लिपमध्ये म्हणत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळावी आहे.

बीडमधून 7 लाख भाविक
बीडजिल्ह्यातून जवळपास 7 लाख भाविक मेळाव्याला जातील. गावागावातून टेम्पो- ट्रक जाणार आहेत. १०० लोकांवर नियंत्रणासाठी २० स्वयंसेवक असतील, असे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती शक्य
मेळाव्यालामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाचा महामेळावा गडावर व्हावा, असा प्रयत्न सत्ताधाऱ्याकडून सुरू आहे. मेळावा गडावरच होणार हे जवळपास निश्चित आहे.

भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप शनिवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत होती. त्या क्लिपमधील संवाद...
‘मी नामदेवशास्त्री आहे. माझ्यामागे पण लोक आहेत, मी सत्तेबरोबर लढतोय. मी माणसं थांबवलीत. जरी तुम्हाला तुमच्या नगरचं कळत असेल ना, तरी मी फाडून खाईल एखाद्याला. एवढी ताकद आहे आमची... नाही तरी आमचे लोक एवढे खवळले आहेत ना .. ‘कोयता’... त्यांना समजत नाही काय? माझ ऐका. तुम्ही या भानगडीत पडू नका,..तुम्ही मध्ये भाग घेऊ नका. मला रमेश घोले काय करतो...अजून कोण काय करतंय, हे सगळ मला लक्षात आहे. मी तर तयारीत आहे, माणस थांबवली आहेत उलट मी. तुमच्या लक्षात येत असेल, की किती परिसर, कसा परिसर आहे.. काही त्रास घेऊ नका. मी मजबूत आहे. तुम्ही ज्या कुळात जन्मला असेल ना तो घुले, तुम्ही असेल, मी असेल... कारण एवढा चांगला गड केला आहे ना...त्या बावळट लोकांची सेवाच केली.. कारण आपल्या आईबाबांचा उध्दार, भगवानबाबांचा उध्दार केलाच पाहिजे. आपली खानदान आहे ती...मी कशाला समजवू, बस, तुम्ही आता समजून घ्या. (दैनिक दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.)

पंकजा मुंडेंच्या पाठीशी भाजप
महादेव जानकर, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी पंकजांची ऑडिओ क्लिप मोडतोड करून तयार केल्याचे म्हटले आहे. भाजप पंकजांच्या पाठीशी दिसतो आहे.

महंतांची खास महिला ब्रिगेड
पंकजांना रोखण्यासाठी नामदेवशास्त्री आठ दिवसांपासून परिसरातील महिलांना प्रशिक्षण देत आहेत. यापूर्वी तरुणांना पुढे करुन मुंडे समर्थकांना रोखले. आता महिलांना पुढे केले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर ऐका पंकजा मुंडे यांच्या व्हायरल झालेल्या Clips
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...