आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केशवराव धोंडगेंनी घेतला पवारांचा मुका; पवार म्हणाले- बरं झालं जाहीर कार्यक्रमात घेतला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने नांदेड विद्यापीठाकडून मानद डी लिट पदवी देवून पवारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी व्यसपिठावरच पवारांचा मुका घेताला. याप्रकारामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. रविवारी (29 फेब्रुवारी) हा कार्यक्रम पार पडला.

केशवराव धोंडगेंच्या या प्रकारानंतर शरद पवार यांनीही मिश्किल प्रतिक्रीया दिली. पवार म्हणाले “बरं झालं केशवरावांनी जाहीर कार्यक्रमात मुका घेतला. मला घरी सांगता तरी येईल, ते केशव धोंडगेच होते. नाहितर, माझी पंचाईत झाली असती”.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची या गौरव सोहळ्याला प्रमुख अपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार केशवराव धोंडगे यांची उपस्थितीत होती. यावेळी केशवरावांनी आपल्या मिश्किल शैलीत थेट पवारांवर टीकेचा भाडीमार केला. शरद पवार व्यासपीठावर उपस्थित असताना त्यांच्यावर एवढी धारदार टीका होण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल.
 
कोण आहेत केशवराव धोंडगे?
मण्याड खोर्‍यातील बुलंद तोफ अशी केशवराव धोंडगे यांची ओळख आहे. केशवराव शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. 95 वर्षे वय असलेले धोंडगे अत्यंत निर्भिडपणे आपले मत व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. केशवराव माजी खासदार असून जेष्ठ स्वतंत्र सेनानी असी देखील त्यांची ओळख आहे.

केशवरावांची टोलेबाजी...
- माजी खासदार केशवराव धोंडगे म्हणाले, शरद पवारांची बारामती म्हणजे 'भानामती' आहे. 
- माणसं फोडण्याचे कौशल्य पवारांना चांगलेच अवगत आहे. कुणाच्या घरातील माणूस केव्हा फोडतील, याचा अंदाज देखिल लावता येत नाही.
- नारदमुनीसुध्दा पवारांची बरोबरी करु शकत नाही, पवार बिना चिपळ्याचे नारद आहेत. असा टोला देखिल धोंडगेंनी लागवला.
- मराठवाड्याच्या विकाससाठी विधीमंडळचे अधिवेशन औरंगाबादेत घेण्यासाठी पवारच अग्रही होते.
- पवारांचे सख्खे भाऊ शेकापमध्ये होते त्यांनाही पवारांनीच राजकारणातून संपवले.
- आणीबाणीत पवारांनी सत्ता सोडली असती, तर चित्र वेगळे असते. परंतु, त्यांना पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री नव्हती, म्हणून पवार सत्तेला चिकटून बसले, असा टोला केशवरावांनी पवारांना लागवला.
- पवारांना एवढ्या डिलीट पदव्या मिळतात, ते काय लोणचं घालणार आहेत का? असा चिमटाही धोंडगेंनी यावेळी काढला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...