आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूलमंत्री खडसेंची बनकिन्होळ्याला भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देऊन त्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी बनकिन्होळा येथे भेटीप्रसंगी प्रशासनास दिले. जिल्हाधिकारी निधी पांडे या वेळी उपस्थित होत्या. बनकिन्होळा गावातील २४ घरांची अतिवृष्टीमुळे पडझड झाल्याची माहिती मिळाल्याने खडसे यांनी तेथे जाऊन आपग्रस्तांशी चर्चा केली. शासनाची मदत मिळाली का, स्वस्त धान्य दुकानदार धान्य देतो का अशी प्रत्यक्ष विचारणा करून त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देऊ नका असे निर्देश प्रशासनास दिले. तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज रविवार दि.२० रोजी घेतली.
विश्रामगृहात त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी निधी पांडे यांचेशी चर्चा करून झालेले नुकसान व करण्यात येत असलेल्या मदतीबाबत आढावा घेतला.