आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवगावात महिलांचा मोर्चा, ग्रामस्थांवर आली दूषित पाणी पिण्याची वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडाळा - भिवगावयेथील ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे महिलांना हातातील काम सोडून हंडाभर पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. तरीदेखील पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिला ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यातच या गावासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर आहे तरीदेखील ते पिण्यासाठी पुरत नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी रानाेमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यातच पिण्यासाठी दूषित पाणी मिळत असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध निषेध व्यक्त केला.
भिवगावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईला आळा बसावा म्हणून शासनाच्या वतीने दोन टँकर मंजूर केले आहेत. प्रत्येक टँकरच्या दोन खेपांप्रमाणे भिवगावास रोज ४८ हजार लिटर पाणी येते, दिवसाला तीन लाख ८४ हजार लिटर उपलब्ध होते. ते ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरत नाही. त्यामुळे एवढे पाणी जाते कुठे, असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा बेजबाबदारपणामुळे दोन महिन्यांपासून गावातील कुठल्याच नळाला अद्यापही पाणी आलेले नाही. त्यातच टँकरमधून येणारे गढूळ पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे.
विहिरीत टाकण्यात येणारे टँकरचे दूषित पाणी, तेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. मात्र, ग्रामपंचायतींने याकडे दुर्लक्ष केले आहे. छाया : सुधीर बागूल
^पिण्याच्या पाण्यासंदर्भातअनेक वेळा तक्रार केली तरीदेखील योग्य प्रकारे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या गावात मोर्चा निघण्याची पहिली वेळ आहे. - संजय गायके, ग्रामस्थ
^पाण्यासाठी रोजंदारीबुडवून टँकरची वाट बघावी लागते. कधी टँकर येते तर कधी नाही. टँकर आले की ते विहिरीत टाकले जाते. मग एकदम विहिरीवर गर्दी झाल्याने पाणी काढतेवेळी पाय घसरण्याची भीती वाटते. त्याकरिता नळाला पाणी सोडावे. - विमल शेषराव तुपे, ग्रामस्थ
^ यागावास दोन टँकर मंजूर आहेत. गावात एकच टँकर येते तेही अर्धवट असल्याने पाणीटंचाई भासत आहे. यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. तरच पाणी समस्या मार्गी लागेल. - कैलास पठारे, सदस्यग्रा. पं.
^राष्ट्रीय पेयजलयोजनेतील पाइपलाइनला अनेक अनधिकृत नळ जोडणी आहे. त्यामुळे या योजनेचा वापर केला जात नाही. अधिकृत जोडणी केल्यानंतर योजनेचा वापर केला जाईल. - बाबासाहेब गायके, उपसरपंच
^भिवगावास चारटँकर मंजूर आहेत. रोज चार खेपा केल्या जातात. सर्वांना समान पाणी मिळावे या उद्देशाने गावातील विहिरीत पाणी टाकले जाते. गावाबरोबर वस्त्यांचीही व्यवस्था करत आहोत. - आर. ए. बागूल, ग्रामसेविका,भिवगाव