आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड जिल्हा बँक; बिनविरोधचा बार फुसका, अशोक चव्हाणांविरोधात खतगावकरांचे पॅनल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा बार अखेर फुसका ठरला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तडजोड झाली नसल्याने अखेर निवडणूक होणार हे स्पष्ट झाले. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी शुक्रवारी सायंकाळी शेतकरी विकास पॅनलच्या नावाने उमेदवारांची घोषणा केली. या वेळी अशोक चव्हाणांविरोधात सर्व विरोधक एकवटल्याचे दिसून आले.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू होते. चव्हाण गट व भास्करराव पाटील गट दोघांचीही यासाठी तयारी होती. बैठका होऊनही तडजोड झाली नाही. आमची तयारी निवडणूक बिनविरोध करण्याची होती, परंतु दुसरा गट मुखेडच्या जागेवर अडल्याने नाइलाज झाला, असे भास्करराव पाटील व आमदार प्रताप पाटील यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रताप पाटील, नागेश पाटील आष्टीकर, मोहन पाटील टाकळीकर, बापूसाहेब गोरठेकर, हरिहरराव भोसीकर, दिलीप कंदुकर्ते, लक्ष्मण ठक्करवाड उपस्थित राहिल्याने विरोधात एकजूट झाली.

आघाडीत दिग्गज
शेतकरी विकास आघाडीत भास्करराव पाटील खतगावकर, प्रताप पाटील चिखलीकर, बापूसाहेब गोरठेकर, मोहन पाटील टाकळीकर, नागेश पाटील आष्टीकर, गंगाधर राठोड, हरिहरराव भोसीकर, दिलीप कंदुकर्ते, प्रवीण पाटील चिखलीकर असे दिग्गज उतरले आहेत.

४५ उमेदवार रिंगणात
शुक्रवारी जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारांची माघार घेण्याची शेवटची मुदत होती. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ७९ उमेदवारांपैकी ३४ जणांनी माघार घेतल्याने आता ४५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. विशेष म्हणजे भाऊराव साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, आमदार अमर राजूरकर, वसंतराव चव्हाण, हनमंत पाटील बेटमोगरेकर, श्रावण भिलवंडे, भगवान पाटील आलेगावकर, संजय लहानकर, संजय भोसीकर या दिग्गजांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेतली.