आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khultabad Municpal Election News In Divya Marathi

खुलताबाद : नगराध्यक्षपदासाठी दुहेरी लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - पालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक आठ ऑगस्ट रोजी होणार असून यासाठी राष्ट्रवादी व आमदार प्रशांत बंब गटात ही लढत होणार आहे. या दोन्ही गटांच्या वतीने प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. अध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांत सरळ लढत होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खुलताबाद नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राष्ट्रवादीच्या वतीने रईसा इसाक कुरेशी तसेच आमदार प्रशांत बंब गटाच्या वतीने सुषमा संजय भावसार यांनी आपले अर्ज दाखल केले. दोन्ही अर्ज वैद्य ठरल्याने आता ही लढत दुहेरी होणार हे स्पष्ट झाले आहे. आमदार प्रशांत बंब गटाचे पालिकेत आठ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे चार व शिवसेनेचा एक तसेच स्वीकृत दोन सदस्य असे एकूण 19 नगरसेवक पालिकेत आहेत. यापूर्वी आमदार बंब गटाचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान होता. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता.

मात्र, यंदा राष्ट्रवादीनेच उमेदवार दिल्याने नगराध्यक्ष कुणाचा होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे. बंब गट, राष्ट्रवादी व काँग्रेसकडे केवळ एक-एक महिला सदस्य आहे. आठ रोजी अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे.