आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सत्तेच्या जवळ, राकाँला फटका, काठावरच्या मतदारांना वळवण्यात भाजपला यश (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- उमेदवारांची निवड, प्रचाराचे नियोजन आणि काठावरच्या मतदारांना वळवण्यात आलेले यश यामुळे भाजप जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुढे आला आहे, तर दुसरीकडे स्थानिक कार्यकर्त्यांचा योग्य समन्वय ठेवण्यात अपयश आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला मतविभाजनाचा लाभ घेता आला नाही, तर राज्यस्तरीय नेत्यांच्या मदतीशिवाय प्रचार करताना सेनेने लढा देण्याचा प्रयत्न केला.
 
मात्र भाजपच्या तगड्या यंत्रणेशी मुकाबला करताना त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ही निवडणूक झाली. यात भाजपने सर्वाधिक २२ जागा जिंकल्या.
 
भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर या दोन्ही नेत्यांनी आपले गड राखलेच; मात्र जिथे भाजपची ताकद नव्हती तेथेही भाजपला यश मिळाल्याने भाजप जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
 
गत निवडणुकीत भोकरदन तालुक्यात १० पैकी ८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्या जागा कायम राखण्यात भाजपला यश आले आहे, तर जाफराबाद तालुक्यात भाजपच्या तीन जागा होत्या तिथे त्यांची एक जागा घटली अाहे.
 
जालना तालुक्यात भाजप अाणि काँग्रेसची ताकद वाढली आहे. गत निवडणुकीत येथे शिवसेनेने ८ पैकी ७ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. आता येथे शिवसेना-काँग्रेसला प्रत्येकी ३, तर भाजपला २ जागा मिळाल्या आहेत. 
बातम्या आणखी आहेत...