आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्माच्या आधारे राष्ट्र उभे राहू शकत नाही : केतकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - धर्माच्या नावाने वेगळ्या देशाची निर्मिती झालेल्या पाकिस्तानात धर्म एक आहे, पण तेथे भाषावाद, संस्कृतीवाद असल्याने पाकिस्तान एकसंध राहू शकला नाही. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर 25 वर्षांनी फाळणी होऊन बांगलादेश निर्माण झाला. त्यातून धर्माच्या नावाने राष्ट्र टिकू शकत नाही, हे समोर येऊन ते कधीही कोसळू शकते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्रच एकसंध राहू शकते, असे मत दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

उदगीर येथील उज्‍जवला देशमुख स्मृती व्याख्यानमालेत भारत आणि फाळणी या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. मधुकर कुलकर्णी, सुभाष देशपांडे उपस्थित होते. पाश्चिमात्य पंडितांचे दाखले देत केतकर म्हणाले, भारताच्या अनेक फाळण्या होतील, असे भाष्य परकीय तज्ज्ञांनी केले होत; परंतु तसे पाकिस्तानविषयी केले नव्हते. गेल्या 65 वर्षांत भारत अनेक वेळा फाळणीच्या उंबरठय़ापर्यंत गेला, पण फाळणी झाली नाही. पंजाबमध्ये खलिस्तानची मागणी होऊन दंगली झाल्या. खलिस्तानच्या मागणीला पाकिस्तानचा प्रत्यक्ष, तर अमेरिकेचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. भारताची फाळणी करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, इंदिरा गांधी यांनी स्वत:चे बलिदान देऊन खलिस्तानची भूमिका मोडून काढली. त्यातून देश वाचला. 1962-63 पासून द्रमुकने तामिळनाडू स्वतंत्र करण्याची मागणी केली होती. र्शीलंका व भारतातील एक भाग एकत्र करून विशाल तामिळनाडू करण्याचा त्यांचा इरादा होता; परंतु द्रमुकची फाळणी झाली आणि देश एकसंध राहिला.

आता काश्मीर हा फाळणीच्या कटाचा एक मुद्दा शिल्लक आहे. पाकिस्तानात 65 पैकी 45 वष्रे लष्करी राजवट राहिली. तेथील राज्यकर्त्यांना लोकशाही निर्माण करता आली नाही व टिकवताही आली नाही, असेही ते म्हणाले.