औरंगाबाद - श्री मंगलनाथ महाराज सेवा संघाच्या वतीने यंदाही आषढीनिमित्त पंढरपुरातील वारकर्यांसाठी सात हजार लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे. यानिमित्त 6 जुलै रोजी मनोज सुर्वे यांच्या न्यू शांतिनिकेतन कॉलनी येथील निवासस्थानी गूळ-शेंगदाण्याचे लाडू बांधणीचे काम सुरू होणार आहे.
श्री मंगलनाथ महाराज सेवा संघाचा हा उपक्रम गेल्या चौदा वर्षांपासून अविरत सुरू आहे. 6 व 7 जुलैदरम्यान भक्त स्वखुशीने पांडुरंगाची सेवा म्हणून या लाडू बांधणीच्या कार्यात सहभाग घेतात. गतवर्षी सुमारे पाच हजार लाडू तयार करून ते पंढरपूर येथे वारकर्यांना वाटप करण्यात आले होते.
मनोज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढीच्या दिवशी सर्व भक्तांना पांडुरंगाचे दर्शन घडवण्यात येते. सर्व भक्तांची राहण्याची व जेवणाची सोयही मोफत करण्यात येते.
माउलीच्या सेवेची संधी
लाडू बांधणीसाठी आम्ही दोन दिवस स्वत:च्या साहित्यासह दिवसभर काम करतो. पांडुरंगाच्या सेवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने करण्याची संधी मिळते हेच आमचे भाग्य. - ताराबाई घुगे, भक्त
महिला मंडळाचा लाडू बांधणीच्या कामात सहभाग असतो. पांडुरंगाच्या नामस्मरणात सर्व भक्त कामात तल्लीन होतात. - ममताबाई थत्ते, भक्त.