आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalita Panchami Ornimental Worship Completed At Mahurgad

माहूरगडावर ललिता पंचमीनिमित्त अलंकार पूजा पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललिता पंचमीच्या दिवशी माहूरगडावरील रेणुकादेवीला साजशृंगार केला जातो. देवीच्या कपाळावर असलेले  - Divya Marathi
ललिता पंचमीच्या दिवशी माहूरगडावरील रेणुकादेवीला साजशृंगार केला जातो. देवीच्या कपाळावर असलेले

नांदेड - नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी बुधवारी माहूरगडावर ललिता पंचमी व रेणुकादेवीची अलंकार पूजा करण्यात आली. नवरात्रात केवळ याच दिवशी रेणुकामातेला सर्व दागिने घातले जातात. कर्णफूल, गहूहार, लक्ष्मीहार, बिंदिया, पिंपळपान हे सोन्याचे दागिने घातले जातात. या दागिन्यांना हिरे, माणिक, मोती, रत्नांनी मढवले आहे. अत्यंत पुरातन असे हे ऐतिहासिक दागिने आहेत. संपूर्ण दागिन्याने मढवलेले देवीचे हे रूप पाहण्यासाठी भाविकांची गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते.


ललिता पंचमीच्या दिवशी माहूरगडावर कलावंतांनी रेणुकामातेच्या दरबारात हजेरी लावण्याची परंपरा आहे. राज्यातील मोठमोठे कलावंत या दिवशी रात्री माहूरगडावर येऊन रेणुकामातेच्या चरणी सेवा समर्पित करतात. विशेष म्हणजे यासाठी कलावंत कोणतीही बिदागी घेत नाहीत. यापूर्वी पंडित कुमार गंधर्व, पंडित छोटा गंधर्व, पंडित नाथ नेरळकर, पंडित अण्णासाहेब गुंजकर, आनंदी विकास देशमुख या कलावंतांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. 00 पंचमीच्या दिवशी या कलावंतांची कला पाहण्यासाठी माहूरगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बुधवारी पंडित श्याम गुंजकर, पंडित संजय जोशी, धनंजय जोशी, प्रमोद देशपांडे, विलास गारोळे या नांदेडच्या कलावंतांनी रेणुका दरबारात हजेरी लावली. यवतमाळचे दत्तात्रय देशपांडे, पुसदचे पंडित चाटी, बोधडीचे वसंत शिरभाते यांनीही हजेरी लावली. या कलावंतांचा रेणुका संस्थानच्या प्रशासक मंडळातर्फे डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, देवीची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.