आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी : जालन्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन शेतकऱ्यांचे खरेदीखत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन शेतकऱ्यांच्या जमिनींचे खरेदी खत करण्यात आले. शिवाय मंत्री शिंदे व अर्जुन खोतकर यांनी दोन गावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुसरीकडे शेतकरी हक्क व बचाव कृती समितीने आपल्या मागण्यांचा रेटा कायम ठेवला अाहे. गुरुवारी समितीच्या वतीने मंत्री शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील २५ गावांमधून जात अाहे. त्यासाठी एक हजार २०० शेतकऱ्यांच्या पाचशे हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेवर सुरुवातीपासून नाराजी व्यक्त केली अाहे. त्यासाठी शेतकरी हक्क व बचाव कृती समिती स्थापन केली आहे. यात शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या समितीने विविध मार्गाने आपला लढा सुरू ठेवून योग्य मोबदला देण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान गुरुवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या मार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची संपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली.   

यानिमित्त जालना येथील दुय्यम उपनिबंधक  कार्यालयात भगवान साळुबा येवले, बाबासाहेब साळुबा येवले, उमाजी साळुबा येवले या शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदीखत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास करून देण्यात आले. या वेळी  पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत जमिनीच्या खरेदी खताची कागदपत्रे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना हस्तांरित करण्यात आली. 

द्राक्षवेलीसाठी १० हजार रुपये  
शेतकऱ्यांच्या बाधित जमिनीला रेडीरेकनरच्या दरापेक्षा जास्तीत जास्त  मावेजा दर देण्यात येणार अाहे. या भागातील महामार्गामध्ये नष्ट होणारे बांधकामे, गोठे, घरे, शेततळे, विहिरी, फळझाडे, बगिचे यांचे मूल्यांकन करून जास्तीत जास्त मोबदला देण्यात येणार आहे. द्राक्षाच्या एका वेलासाठी मोबदला म्हणून १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...