आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Large Solar Project In Osmanabad, News In Marathi

धुळ्यानंतर राज्यातील सौरऊज्रेचा मोठा प्रकल्प होणार उस्मानाबादेत, 100 मेगावॅट सौरऊज्रेचा प्रकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - धुळ्यानंतर राज्यातील सर्वात मोठा 100 मेगावॅट सौरऊज्रेचा प्रकल्प उस्मानाबादनजीक कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यान्वित होत आहे. राज्य शासनाच्या महाजेनको कंपनीने यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू केली असून टाटा, रिलायन्स, भेल, शापूर्जी-पलुन्जी, वेलस्पन आदी कंपन्यांनी निविदा स्वीकारल्या आहेत. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅटच्या या प्रकल्पासाठी 350 कोटींची गुंतवणूक होणार आहे.

तत्कालीन उद्योग राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून 2006-07 मध्ये उस्मानाबाद शहरानजीक कौडगाव शिवारात औद्योगिक वसाहत उभारणीचे काम सुरू झाले. शासनाच्या मंजुरीनंतर या भागात सोलर पार्क उभारण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला व्हिडिओकॉन या कंपनीने सोलार पार्कसाठी 300 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, व्हिडिओकॉनने माघार घेतल्यानंतर राणा पाटील यांनी ऊर्जामंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून शासनानेच सौर पार्क उभारावे, अशी मागणी केली. त्यानंतर शासनाने 100 मेगावॅटच्या प्रकल्प उभारणीला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅटचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 350 कोटींची गुंतवणूक असून महाजेनकोमार्फत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारी (दि. 21) निविदा स्वीकारण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नामवंत कंपन्यांनी निविदा स्वीकारल्या असून ही प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅट, त्यानंतर 50 अशी 100 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करणारा उस्मानाबाद हा राज्यातील दुसरा जिल्हा असेल. धुळे येथे शासनाचा 125 मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित आहे. सोलर जिल्हा करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

कुठे आहे एमआयडीसी? : उस्मानाबादपासून 10 किलोमीटर अंतरावर बार्शी रस्त्यालगत कौडगाव शिवारात औद्योगिक वसाहत उभारत आहे.
प्रतिनिधींकडून जागेची पाहणी
तालुक्यातील कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी उत्सुक असलेल्या 6 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बुधवारी जागेची पाहणी केली. त्यानंतर माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत एमआयडीसीचे विभागीय अधिकारी संतोष पाटील, महाजेनकोचे कार्यकारी अभियंता आर. पी. कुमावत यांची कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. गुंतवणुकीसाठी कंपन्यांची अनुकूलता असल्याचे महाजेनकोच्या अधिकार्‍यांनी सांगीतले. सोलर उद्योगासाठी अधिकाधिक कंपन्यांना निमंत्रित करण्यात येत असल्याचे माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी या वेळी सांगितले.

असा असेल प्रकल्प
सौरऊर्जा निर्मिती खर्चिक बाब असून एका मेगावॅटला सुमारे 7 कोटी रुपये खर्च येतो. कौडगाव वसाहतीमध्ये पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) अंतर्गत प्रकल्प उभारण्यात येत आहे. वीज उत्पादनासाठी खासगी कंपनी प्रतिमेगावॅट 4 कोटी, तर महाजेनको 3 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. 25 वर्षांच्या करारावर ही निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. केएफडब्ल्यू ही र्जमन वित्तीय संस्था या व्यवसायासाठी कर्ज देणार आहे.