आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडहून गो एअरच्या विमानाचे शेवटचे उड्डाण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - नांदेड विमानतळावरून 2008 पर्यंत सुरू असलेली विमानसेवा मंगळवारपासून बंद होणार आहे. मंगळवारी हाऊसफुल्ल गर्दीत गो एअरच्या विमानाने येथील विमानसेवेचा समारोप केला. दिल्ली-नागपूर-नांदेड-मुंबई हे विमान सकाळी नांदेड येथून मुंबईकरिता रवाना झाले. त्या विमानातून पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्यासह 170 प्रवासी मुंबईकडे रवाना झाले. या विमानाचे मुंबईसाठी शेवटचे उड्डाण होते. रात्री साडेआठ वाजता मुंबई-नांदेड-नागपूर-दिल्ली हे विमान रवाना झाले.
तेव्हाही त्यात 170 प्रवासी होते. दोन्ही मार्गावर विमानसेवेच्या शेवटच्या दिवशी हाऊसफुल्ल गर्दी दिसून आली. तथापि गोएअरने या मार्गावर प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगत येथील विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्पाइसजेटची सेवा फेब्रुवारीपासून
जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी मंगळवारी येथे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नाने स्पाइसजेट विमान कंपनी फेब्रुवारीपासून मुंबई-नांदेड-मुंबई सेवा सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस राहणार आहे. स्पाइसजेट कंपनी याबाबत लवकरच घोषणा करणार आहे. स्पाइसजेटचे विमान 90 आसनी राहणार आहे.