आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lasur Railway Station Toll Both Close Issue News, Divyamarathi

मूलभूत सुविधा नसल्याने लासूरचा टोलनाका बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासूर स्टेशन- नागपूर-मुंबई महामार्गावरील लासूर स्टेशनजवळील टोलनाका शनिवारी मध्यरात्री सुरू करण्यात आला होता. परंतु मूलभूत सुविधा पुरविल्या नसल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता उदय बरडे यांना प्रत्यक्ष नाक्यावर बोलावून दाखवून दिले. त्यामुळे टोलनाका बंद ठेवण्याचे आदेश घई कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार विजय दायडे यांना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास देण्यात आले.

नाक्यावर कॉम्प्युटराइज्ड पावत्या नाहीत, ऑटोमॅटिक बॅरिकेड्स नाहीत. डिजिटल डिस्प्ले नाही, पाण्याची व्यवस्था, जनरेटर, शौचालय आदी सुविधा शासनाच्या निकषाप्रमाणे अत्यावश्यक आहेत, असे आमदार प्रशांत बंब यांनी बरडे यांना बजावून सांगितले. शहर विकासासाठी जे चार टोलनाके सुरू होते, ते वरिष्ठांकडे कायदेशीर पाठपुरावा करून बंद केले होते. शहरापासून हा नाका 30 कि.मी.वर आहे. त्यात रस्ताही खडबडीत असल्याचे बंब यांनी म्हटले आहे.

वसुली बंदचे आदेश
जोपर्यंत पूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तोपर्यंत टोलवसुली बंद करण्याचे आदेश मी वरिष्ठांच्या आदेशावरून टोलचालकास दिले आहेत. खरे तर सुविधा असतानाच टोलवसुली करावी हा नियम आहे. येथे सुविधा अपूूर्णच आहेत. आमदार बंब यांनी आमच्या वरिष्ठांना याविषयी माहिती दिल्याने आम्हाला टोलवसुली बंद करण्याचे आदेश आले होते.