लासूर स्टेशन - लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेल्या कांदा खरेदी केंद्रात रविवार, 29 जून रोजी कांद्याला विक्रमी 2700 रुपये भाव मिळाला. भाव वाढल्याने एकाच दिवसात 20 हजार कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. चांगल्या कांद्याला 2300 ते 2700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील दोन आठवड्यांपासून सतत काद्याच्या भावात वाढ होत असल्याने शेतकर्यांत आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे. गेल्या आठवड्यात 2100 ते 2350 रुपयांपर्यंत कांद्याला भाव होता. रविवारच्या लिलावात भावात विक्रमी वाढ झाली. 2700 रुपयांपर्यंत कांद्याला भाव मिळाला. भावात वाढ होत असल्याने शनिवारपासून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कांदा बाजारपेठेतील सर्व वीस कांदा खरेदी केंद्रांवर गर्दी झाल्याचे दिसून आले. गोल्टी कांद्याला 1500 रुपये, तर मोठ्या कांद्याला 2300 ते 2700 रुपयांपर्यंतभाव दिल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. बाजार समितीचे कर्मचारी कचरू रणयेवले, रावसाहेब तांबे, संतोष पवार यांनी कांदा बिटाचे काम पाहिले. सातत्याने कांद्याच्या भावात वाढ होत असल्याने शेतकर्यांची ओढ लासूर स्टेशनच्या कांदा बाजारपेठेकडे वाढत आहे.