आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ गावांचा वाहतूक प्रश्न, क्रॉसिंगला रेल्वेगेटच सुरक्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - खडकनारळा-डोणगाव मार्गावर रेल्वे अंडरब्रिजऐवजी आता रेल्वे गेट होणार असल्याचे संकेत रेल्वे विभागाकडून मिळाले असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अंडरब्रिजच्या कामाचे साहित्य रेल्वे विभागाने परत घेऊन जात रेल्वे गेटचा मार्ग खुला झाल्याने नागरिकांचा रोष शमला आहे. लवकरच मंजुरी मिळणार गेट होणार यामुळे वाहतूकही सुरळीत होणार आहे.
नागपूर-मुंबई आणि औरंगाबाद-नाशिक अशा दोन मुख्य महामार्गांशी जोडणाऱ्या खडकनारळा ते डोणगाव रस्त्यावर रेल्वेगेट नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी रेल्वेगेट बसवावे, अशी मागणी परिसरातील २५ गावांतील नागरिकांनी रेल्वे खात्याकडे केली आहे. सहा महिन्यांपूर्वी रेल्वे विभागाने सुरू केलेल्या अंडरब्रिज मार्गाच्या कामाला परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत ते काम बंद केल्याने नागरिकांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे. नागरिकांच्या मते अंडरब्रिजमुळे मोठी वाहने गावापर्यंत येणे शक्य होणार नाही. परिणामी, दळणवळण, शेतमाल विक्री इतर कामांवर परिणाम होणार आहे.
दररोज दिवसातून तब्बल ४० रेल्वेगाड्यांची ये-जा असते. खडकनारळा ते डोणगाव रस्त्यावरून गेलेल्या पटरीवर रेल्वेगेट नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे खात्याने येथे काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली असून तो कर्मचारी रेल्वेच्या वेळेवर झेंडा दाखवून वाहनांना थांबवतो. त्यामुळे या रस्त्यावर रेल्वेगेट अत्यंत गरजेचे असून डोणगाव, रायपूर, धामोरी, खडकनारळा, वसुसायगाव, रांजणगाव पोळ, सावंगी, लासूर स्टेशन, गवळीशिवरा, गवळीधानोरा, प्रतापूरवाडी, गोळेगाव, आरापूर, गाजगाव, खादगावसह २५ गावांतील जनतेसाठी महत्त्वाचा आहे.
खडक नारळामार्गावरीलरेल्वे क्रॉसिंगची पाहणी करत तसेच ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार येथे रेल्वेगट बसवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव दिला असून लवकरच प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
- सुरेशकुमार सुमन, वरिष्ठ अनुभाग अभियंता
रस्त्यावर पूर्वीवाहतूक कमी होती. सध्या मार्गावर मात्र वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रेल्वे फाटक बसवणे अत्यंत गरजेचे आहे.
- संतोष सोमाणी, अध्यक्ष,रेल्वे प्रवासी सेना
वर्दळीमुळे रेल्वेगेटच पाहिजे
येथे रेल्वे गेटच बसवावे अशी मागणी आम्ही वेळोवेळी करत आलो आहोत अंडर ब्रिजमुळे येथून मोठ्या वाहनांना जाता येणार नाही वाहतुकीच्या वर्दळा मुळे येथे रेल्वेगेट महत्त्वाचा आहे.
- कृष्णा पाटील डोणगावकर, सभापती कृउबा लासूर स्टेशन
अंडर ब्रिजवाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने येथे रेल्वेगेटच बसवावे अशी मागणी आम्ही पूर्वी पासून लावून धरली होती तसा पाठपुरावादेखील वरिष्ठांकडे केलेला आहे. मध्यंतरी अंडर ब्रिज कामाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या तेथे बांधकाम सहित्य येऊन पडले होते मात्र पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता रेल्वे विभागाला काम थांबवावे लागले आता रेल्वेगेट बसवण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचे कळते.
- अनिल चोरडिया, जिल्हापरिषद सदस्य
अडचणी लक्षात घेऊन येथील भुयारी मार्गाचे काम थांबवले आहे. रेल्वेगेट बसवा, अशी मागणी पाच ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेचे ठराव घेऊन विभागाकडे केली आहे. त्यादृष्टीने विचार सुरू असल्याचा आनंद आहे.
- विमलबाई थोरात, सरपंच,खडकनारळा