आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गला गोपीनाथ मुंडे यांचे नाव; जिल्हा परिषदेत ठरावाला मंजूरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड जिल्हा रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्षे प्रयत्न केले. - Divya Marathi
बीड जिल्हा रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्षे प्रयत्न केले.
बीड- अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा ठराव बीड जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत या ठरावाला सर्वांनीच पाठिंबा दिला. अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग लवकरच दृष्टीक्षेपात येणार आहे. रेल्वे मार्गाचं काम प्रगती पथावर असून पहिल्या टप्प्यातील अहमदनगर ते नारायणडोह रेल्वेमार्ग जवळपास पूर्ण होत आला आहे.
 
बीड जिल्हा रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्षे प्रयत्न केले. या मार्गाला मंजुरी मिळाली आणि कामही सुरु झाले. मात्र त्यांच्या हयातीत हा मार्ग प्रत्यक्षात येऊ शकला नाही. त्यामुळे या रेल्वमार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी बीड जिल्ह्यातून जोर धरत होती. अखेर जिल्हा परिषदेने त्याला एकमताने मंजुरी दिली. या रेल्वे मार्गाच्या नामकरणाची पहिली पायरी आता पार पडली आहे. यापुढे नामकरणाची पुढील प्रक्रिया होईल. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...