आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Marathi News Sushil Kumar Shinde Calls Arvind Kejriwal A Mad Chief Minister Aap

केजरीवाल \'वेडा मुख्यमंत्री\', गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची जीभ घसरली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वेडा मुख्यमंत्री म्हटले आहे. येथील एका कार्यक्रमात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, 'जेव्हा मी पोलिस दलात होतो तेव्हा माझ्या लग्नानंतर माझी सुटी रद्द करण्यात आली होती. वांद्रे येथे खेरवाडी पोलिस्टेशनमध्ये मी कार्यरत होतो. तेव्हा दंगल सुरु असल्यामुळे माझी सुटी रद्द झाली होती. त्यामुळे मला हनिमूनला जाता आले नाही.' त्यानंतर केजरीवाल यांचा उल्लेख टाळून शिंदे म्हणाले, 'आता एका वेड्या मुख्यमंत्र्यामुळे मला पोलिसांच्या सुट्या रद्द कराव्या लागल्या.' गृह मंत्री शिंदे यांच्या या वक्तव्यापासून काँग्रेसने स्वतःला दूर ठेवले आहे. तर, आपच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया यांनी शिंदेनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
पत्रकारांना टाळले

केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमाराला वायुदलाच्या विशेष विमानाने नांदेड येथील विमानतळावर आगमन झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पालकमंत्री डी.पी.सावंत,वर्षा गायकवाड,अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव, खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. दिल्लीतील घटनांच्या पार्श्वभूमिवर गृहमंत्री काही बोलतील या अपेक्षेने पत्रकारही विमानतळावर आले होते. तथापि त्यांच्या दिशेने स्मितहास्य करुन गृहमंत्री शिंदे हिंगोलीकडे रवाना झाले. हिंगोली जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपून सायंकाळी चारच्या सुमाराला गृहमंत्री वायुदलाच्या विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, केजरीवाल यांची शिंदेवर आगपाखड