आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News About Teachers Locked In School, Divya Marathi

पालकांनी चार शिक्षकांना 3 तास शाळेतच कोंडले, शिक्षकाच्या बदलीवरून वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहारा - बेलवाडी येथील नागरिकांनी शिक्षकाच्या बदलीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून चार शिक्षकांना शनिवारी 3 तास वर्गात कोंडून टाकले. 30 नागरिकांनी शाळेसमोर उपोषण सुरू केले. अखेर संबंधित शिक्षकाच्या जागी तात्पुरत्या एका विषयतज्ज्ञाच्या नेमणुकीचे पत्र गटशिक्षणाधिकार्‍यांनी दिले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.
बेलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक एम. जे. सौदागर यांची तत्काळ इतरत्र बदली करून त्यांच्या ठिकाणी चांगल्या शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शिक्षक एम. जे. सौदागर यांनी 2005 ते 2011 या कालावधीत बेलवाडीत शाळेत सेवा केली आहे. त्यानंतर त्यांची अन्यत्र बदली झाली होती. दरम्यान, त्यांचे अध्यापन समाधानकारक नाही, असा आरोप करीत नागरिकांनी विरोध करून त्यांची बदली करण्यास भाग पाडले होते. दरम्यान, 11 ऑगस्ट रोजी ते शाळेत रुजू झाले. ग्रामस्थांनी याविरोधात मंगळवारी (दि. 12) शाळेला टाळे ठोकले. गुरुवारी दुपारी गटशिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार यांनी नागरिकांशी संवाद साधून संबंधित शिक्षकास या शाळेवर येऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.
त्यामुळे नागरिकांनी शाळेचे कुलूप उघडले.
शिक्षक सौदागर 15 ऑगस्ट रोजी शाळेवर आले. संतापलेल्या नागरिकांनी मुख्याध्यापक डी. एस. कोकणे, शिक्षक डी. एन. जाधव, के. ए. मोरवे, नानासाहेब कोळी यांना शाळेच्या खोलीत कोंडले. लोहारा पोलिसांनी त्यांची मुक्तता केली. शिक्षण विस्तार अधिकारी एन. टी. आदटराव यांनी शिक्षक सौदागर यांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात ए. जी. लहाने यांची नियुक्ती केली. त्यानुसार उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.