आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरणाच्या दोन घटनांनी हादरले लातूर शहर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूरमधील एका व्यापाºयाचे बीड जिल्ह्यातून तर एका विद्यार्थ्याचे पुण्यातून अपहरण करून त्यांना लुटल्याचे दोन प्रकार एकाच दिवशी घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. यातील व्यापाºयाच्या प्रकरणात नागरिकांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचू शकले तर विद्यार्थ्याच्या प्रकरणात मच्छीमारांच्या पुढाकारामुळे त्याचे प्राण वाचले. मात्र, आरोपी सापडू शकले नाहीत. विशेष म्हणजे व्यापाºयाच्या अपहरणात अट्टल गुंडांऐवजी शहरातीलच महाविद्यालयीन विद्यार्थी सापडल्यामुळे लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नलाही गालबोट लागले आहे.
शेजारील उस्मानाबाद, बीड आणि कर्नाटकाच्या सीमा भागातील नागरिकांसाठी लातूरची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. लातूरमधील अनेक व्यापारी होलसेलचा उद्योग करतात. त्यामुळे संबंधित माल पुरवण्यासाठी आणि त्याच्या वसुलीसाठी लातूरच्या व्यापाºयांना लहान-लहान गावांमध्येही फिरावे लागते. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील धर्मापुरी भागात लातूरचे इलेक्ट्रिकल्स वस्तूंचे व्यापारी प्रदीप बाहेती नेहमीप्रमाणे माल पोहोचवण्यासाठी गेले होते. लातूरहून परळीकडे जाणारा शॉर्टकट मार्ग म्हणून धर्मापुरी रस्त्याचा वापर केला जातो. वाहतूक कमी असल्यामुळे हा परिसर निर्मनुष्य आहे. वाहनांची वर्दळ नसल्यामुळे व्यापाºयाचे तेथून अपहरण करण्याचा डाव रचण्यात आला. अपहरण होताना व्यापाºयाने आरडाओरड केल्यामुळे परिसरातील शेतकºयांनी सजगता दाखवली. एवढेच नव्हे तर त्यांनी हिंमत करून दोघांना पकडूनही ठेवले. या प्रकरणात बीडचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक, लातूरचे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि उपअधीक्षक दीपाली घाडगे यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळेच अपहरणकर्ते ताब्यात येऊ शकले.
दुसºया प्रकारात लातूरमधील व्यापाºयाचाच मुलगा असलेल्या निखिल गटागट याने प्रियंका टॅव्हल्सने लातूर-पुणे असा प्रवास केला. त्याच्या बॅगमध्ये शैक्षणिक शुल्कासाठीचे 60 हजार रुपये होते. त्याने ते उघडून पाहिले. त्याचवेळी त्याच्या सहप्रवाशाने चाकूचा धाक दाखवत त्याला रिक्षात कोंबले आणि नाकाला रुमाल लावून बेशुद्ध केले. त्याला जाग आली तेव्हा तो नवी मुंबईतल्या खाडी पुलाच्या खाली होता. पैसे काढून घेऊन त्याला फेकून देण्यात आले होते.
जिल्ह्यात अवैध धंद्यांचे साइड इफेक्ट - लातूर जिल्ह्यात अवैध धंदे, मटका, दारू याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे या चैनीच्या बाबींसाठी कोणत्याही मार्गाने पैसे मिळवण्याची मानसिकता वाढीस लागल्यामुळेच चोºया करणे, पैशांची बॅग हिसकावणे, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावणे, अपहरण करणे असे गुन्हे वाढीस लागले आहेत.- बसवराज वळसंगे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ
गेल्या वर्षभरात व्यापाºयांसोबत घडलेले गैरप्रकार
-सोयाबीनच्या ट्रकचे 65 लाख रुपये घेऊन मुनीमानेच केला पोबारा
-सराफा व्यापाºयाच्या घरातून साडेनऊ लाख पळवले
-जालन्याच्या स्टील व्यापाºयाची साडेआठ लाखाची बॅग हिसकावली
-साडीच्या होलसेल व्यापाºयाने दीड कोटीचा गंडा घालून केला पोबारा