आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळेगावातील स्फोट अपघात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/लातूर- लातूर जिल्ह्यातील नळेगावात एसटी बसमध्ये शुक्रवारी झालेला शक्तिशाली स्फोट हा अपघात असल्याचा दावा एटीएसच्या अधिका-यांनी केला आहे. मात्र, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच खरा प्रकार स्पष्ट होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी शनिवारी दिली.

उदगीर-लातूर बसमध्ये नळेगावात शुक्रवारी स्फोट झाला. त्यात 19 प्रवासी जखमी झाले. घटनेच्या तपासासाठी एटीएसची पथके लातूर व बिदरला रवाना झाली आहेत. रानडुकरे मारण्यासाठी गंधकाचा वापर होतो. उष्णता आणि घर्षणामुळे याच गंधकाने पेट घेतला असावा, असे पोलिस म्हणतात. स्फोटकांचे अवशेष शनिवारी औरंगाबादच्या फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. घातपाताचा प्रकार नसून, निष्काळजीपणामुळेच स्फोट झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी घटनास्थळाला भेट दिली. दोन दिवसांनी नेमके कारण कळू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.