आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या व्यापाऱ्याला साडेतीन कोटींचा गंडा, आरोपी तीन राज्यांतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर -उधारीवर सोयाबीनची पेंड घेऊन येथील एका व्यापाऱ्याला संगनमताने साडेतीन कोटींचा गंडा चार राज्यांतील व्यापाऱ्यांसह मुंबई येथील रसेक्स ट्रेडर्सने घातला आहे. याप्रकरणी १२ जणांवर येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टंेबर २०१३ ते जानेवारी २०१४ या कालावधीत हा प्रकार झाला आहे.
येथील व्यापारी शांतीलाल किसनलाल साबू यांचे लातूर तालुक्यातील ममदापूर येथे ‘लातूर साॅलवंट’ नावाची एक फर्म आहे. तेथे सोयाबीनची पेंड काढली जाते व त्याची विक्री राज्य व राज्याबाहेरील व्यापाऱ्यांना केली जाते. साबू यांची मुंबई येथील रसेक्स ट्रेडर्सचे मालक विजय मजेठिया यांच्याशी व संचालकांशी ओळख झाली. मजेठिया यांनी साबू यांना अनेक ग्राहक मिळवून दिले. याबदल्यात रसेक्सला कमिशन मिळत असे. मजेठिया यांनी दिलेले ग्राहक घेतल्या मालाचे वेळेवर पैसे देत असल्याने त्यांच्यावर साबू यांचा विश्वास वाढत गेला. २०१३ मध्ये विजय मजेठिया यांनी बंगळुरू येथील बालाजी ट्रेडर्स, हसन येथील महाराष्ट्र फीड, नेल्ल्ूर (आंध्र प्रदेश) येथील श्री अॅक्वाटेक व इंदूर (मध्य प्रदेश) येथील जयंत एन्टरप्राइझेस हे नवे ग्राहक साबू यांना मिळवून दिले. प्रारंभी त्यांचा व्यवहार चोख होता. तथापि, सप्टेंबर २०१३ ते जानेवारी २०१५ पर्यंत या फर्मने ३ कोटी ५१ लाख ६३ हजारांचा माल उचलला; परंतु त्याची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे साबू यांनी रकमेबाबत त्यांच्याकडे तगादा लावला. ही बाब त्यांनी विजय मजेठिया यांच्या कानावरही घातली. मेल व पत्रव्यवहारही केला. ‘आज ना उद्या तुमचा पैसा ते परत करतील काही काळ थांबा’ असे मजेठिया सांगत, तर साबू ऐकत राहिले. शेवटी मजेठिया यांनी साबू यांना एक कोटीचा धनादेश दिला व उर्वरित रक्कम काही दिवसांत िमळेल असे सांगितले.

तथापि, धनादेश बाऊन्स झाला. त्यानंतर सर्वच रकमेचे धनादेश संबंधित फर्मनी काढले असल्याचे सांगत साबू यांना धनादेशाच्या झेराॅक्स पावत्या देण्यात आल्या, परंतु धनादेश आले नाहीत. संयम ठेवून साबू यांनी मजेठिया व फर्मच्या मालकांना पैसे द्या, अशी वारंवार विनंती केली. त्या वेळी फर्मच्या मालकांनी रक्कम रसेक्सला दिल्याचे सांगितले. शेवटी आपण फसलो गेल्याची खात्री साबू यांना झाली व त्यांनी पोलिस ठाणे गाठले.

हे आहेत आरोपी
विजय मजेठिया, इना मजेठिया, सतीश मेहता, नितेश जोशी, प्रवीण खोसे, कन्यकम पिल्लई, निखिल देसाई, भूपेंद्र खडक (सर्व रसेक्स ट्रेडर्स मुंबई), पी. कृष्णमूर्ती नायडू (बालाजी एन्टरप्राईझेस बंगळुरू), अलीभाई ( महाराष्ट्र फीड हसन), रेड्डी (श्री अॅक्वाटेक नेल्लूर आंध्र प्रदेश), संजय मोदी ( जयंत एन्टरप्राईझेस इंदोर मध्य प्रदेश)

अनेकांना गंडा
रसेक्सने मराठवाडा, विदर्भ, खान्देश येथील अनेक व्यापाऱ्यांना गंडा घातला आहे. त्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्याविरोधात बंगळुरू पोलिसांत तक्रार दिली होती. हे प्रकरण जिथे घडले तेथील पोलिसांत तक्रार करा, असा सल्ला बंगळुरूच्या पोलिसांनी दिला. त्यावरून लातुरात तक्रार दाखल केली. -शांतीलाल साबू, लातूर साॅलवंट
डॉक्टरला गंडा; तिघे अटकेत
पथकांची तपासणी सुरू
तुळजापूर - याप्रकरणी आरोपींच्या शोधार्थ दोन पथके गठित करण्यात आली अाहेत. पथकांनी तपास सुरू केला आहे. आर. आर. सय्यद, सपोनि, लातूर.

फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तुळजापुरातील डॉक्टरला पुण्यातील महिलेने साथीदारांच्या मदतीने २५ लाख रुपयांना गंडविल्याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी सदरील महिलेसह तीनजणांना गजाआड केले असून, यामध्ये आणखी नऊ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तुळजापूर शहरातील माऊलीनगर भागातील डॉ. पवन पाटील या आर्थोपेडिक डॉक्टरला फेसबुकच्या फेक अकाउंटवरून चॅटिंगद्वारे प्रेमाच्या जाळ्यात अोढून, लग्न करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील महिलेने तिच्या साथीदारांमार्फत वेगवेगळ्या वेळी एकूण २५ लाख रुपयांची रक्कम उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये गेल्या वर्षभरात कधी व्यावसायिक कामासाठी तर कधी मंुबईत दुकान विकत घ्यायचे आहे, असे सांगून प्रेमाचे, लग्नाचे आश्वासन देऊन सदरील रक्कम घेण्यात आली. परंतु, मुदत उलटूनही रक्कम मिळत नसल्याने तसेच चॅटिंग करणारी, फोनवर बोलणारी महिला प्रत्यक्षात भेटत नसल्याने डॉ. पाटील यांना या प्रकरणाचा संशय आला. या प्रकरणाबाबत माहिती घेऊन त्यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी अर्पणा सतेय उर्फ सत्यजीत बसवंती, कुणाल गांधी व सुरेश भोसेकर (सर्व रा. पुणे) यांना शुक्रवारी (दि.१७) पुणे येथून अटक करून तुळजापूर येथे आणण्यात आले. या तीनही आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...