आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर: भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री, उमेदवाराच्या पतीवर फेकला उकळता चहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप उमेदवार शितल मालू यांचे पती विनोद यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. - Divya Marathi
भाजप उमेदवार शितल मालू यांचे पती विनोद यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लातूर - महापालिका निवडणुकीच्या धुमाकूळात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला आहे. यात प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप उमेदवार शितल मालू यांचे पती विनोद मालू यांना जबर मारहाण करण्यात आली. काँग्रेसच्या उमेदवार विद्द्या पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचे वृत्त आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीप्रमाणे, विनोद मालू यांच्या अंगावर उकळता चहा फेकून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर भाजप उमेदवार शितल मालू यांचे पती विनोद यांना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपने हा प्रकार म्हणजे, काँग्रेसच्या गुंडगिरीचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया दिली. तसेच जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत.

लातूर, चंद्रपूर आणि परभणी महापालिका निवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहेत. मतदानाच्या एका दिवसापूर्वीच हा प्रकार घडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...