आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur Congress Candidate Selection Issue, News In Marathi

बनसोडे यांची उमेदवारी निश्चित; काँग्रेस उमेदवार निवडीसाठी मतदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - राहुल गांधी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या प्रायमरीजमधून दत्तात्रय बनसोडे यांनी घवघवीत मतदान मिळवून बाजी मारली. सध्या लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले बनसोडे काँग्रेसचे लातूर लोकसभेचे उमेदवार असतील.

दरम्यान, आमदार दिलीपराव देशमुख, अमित देशमुख यांच्यासह सर्वांनाच आपले ओळखपत्र दाखवून मतदान केंद्रात प्रवेश मिळवावा लागला. ग्रामीणचे आमदार वैजनाथ शिंदे यांचे ओळखपत्र विसरल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कडक भूमिका घेतल्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

सकाळी नऊ वाजेपासून नाव
नोंदणी करण्यात आली. अकरा वाजता प्रत्येक उमेदवाराला प्रत्येकी नऊ मिनिटे देऊन आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यातआली. त्यानंतर दुपारी दीड वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सरपंच, पंचायत समिती सदस्यांकडे ओळखपत्र नसल्यामुळे परत जावे लागले. नगरसेवक दीपक सूळ यांची निरीक्षकांसोबत बाचाबाचीही झाली.

माने यांची तक्रार : लातूरचे माजी उपनगराध्यक्ष मोहन माने इच्छुक होते. त्यांनी निवडणूक प्रक्रियेनंतर निरीक्षकांकडे तक्रार दाखल केली. ती केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली. तक्रारीत त्यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष समद पटेल यांनी दत्तात्रय बनसोडे यांच्यासाठी लॉबिंग केल्याचा आरोप केला आहे.

असे झाले मतदान
दत्तात्रय बनसोडे : 760
मोहन माने : 80
भा. ई. नगराळे : 28
बालाजी कांबळे : 21
जयंत काथवटे : 33
सुनीता आरळीकर : 19
रमाकांत जोगदंड : 00
झालेले मतदान : 1017
अवैध : 76
एकूण मतदार :1158