आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांची सतर्कता; नरबळी टळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शिरूर अनंतपाळ तालुक्यातील माचरटवाडी (भालके) शिवारात गुप्तधन काढण्यासाठी दोन बालकांचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. पोलिस मात्र केवळ होमहवन करून पूजा करण्यात आल्याचे सांगतात. हा प्रकार मंगळवारी समोर आला.

माचरटवाडी शिवारात अनिल कुलकर्णी (निटूरकर) यांची शेती आहे. कुलकर्णी हे सध्या लातुरात राहतात. त्यामुळे त्यांची जमीन निटूर येथील महादू बुडगे हे करतात. शेतात पत्र्याचे शेड असून तेथे झाड आहे. झाडाजवळ बसल्यानंतर बुडगे यांना त्या ठिकाणी सोन्याचा हंडा असल्याचा भास व्हायचा. किंबहुना त्यांनी काही लोकांना तसे सांगितलेही होते. त्यानुसार सोन्याचा हुंडा गुपचूपपणे काढून घेण्यासाठी बुडगे व त्याच्या साथीदारांनी कट रचला. त्यातच त्यांना कोणीतरी सांगितले की, हंडा काढण्यासाठी दोन लहान मुलांचा बळी द्यावा लागेल.

त्यानुसार 27 जूनच्या अमावास्येच्या रात्री पुणे पासिंगच्या चार, पाच आलिशान गाड्यांतून दोन मुलांना तेथे आणण्यात आले. त्यानंतर गाडीतील काही जण पूजेसाठी काळ्या गायीचे दूध, वडाच्या फांद्या गोळा करू लागले. त्यामुळे ग्रामस्थांना काहीतरी भानगड असल्याचे जाणवू लागले. पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी हंडा काढण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, दोन बालके, दोन महिला व 16 व्यक्तींची चौकशी केली. त्या वेळी पोलिसांनी तडजोड करून सर्वांना सोडून दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी फिर्याद दिली. दरम्यान, काही जणांची चौकशी करून त्यांना सोडून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.