आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या रुग्णाला स्वाइन फ्लूचे निदान, पुण्याच्या प्रयोग शाळेने दिला अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- शहरातील एका खासगी रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या रुग्णाला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. त्याच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. ही माहिती रुग्णावर उपचार करणारे डॉ. राधेश्याम कुलकर्णी यांनी दिली.
पूजा गुप्ता (२८, रा. लातूर) असे रुग्णाचे नाव असून, त्या गरोदर आहेत. त्या १९ जानेवारी रोजी येथील स्वामी विवेकानंद रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय आल्याने त्यादृष्टीने उपचार करण्यात येत होते. शिवाय त्यांच्या थुंकीचे नमुने २० जानेवारी रोजी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. पुण्याच्या प्रयोग शाळेने त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल रविवारी दिला असून, त्या दृष्टीने आता उपचाराला गती देण्यात आली आहे. त्या उपचाराला प्रतिसाद देत असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
किट उपलब्ध करून देण्यास झाला होता वि‍लंब-
२० जानेवारी रोजी विवेकानंद रुग्णालयात पुणे येथे थुंकी पाठवण्यासाठी लागणारे मेडिया किट उपलब्ध नव्हते. त्यामुळे िववेकानंद रुग्णालयातील डॉ. राधेश्याम कुलकर्णी यांनी िजल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे किट देण्याची िवनंती केली. परंतु सरकारी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी रुग्ण आमच्याकडे अॅडमिट असेल तरच ते देता येते. त्यासाठी रुग्णाला आमच्याकडेच अॅडमिट करा, असा पवित्रा घेतला होता. शेवटी िववेकानंद रुग्णालयातील डॉक्टरांनी वारंवार िवनंत्या केल्यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास िजल्हा रुग्णालयातून किट उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे सरकारी डॉक्टरांच्या अनास्थेमुळे थुंकी पाठवण्यास एक दिवस उशीर झाला होता. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी वरिष्ठाचा सल्ला घेण्यात उशीर झाल्याचे सांगत वेळ मारून नेली होती.
आरोग्य विभाग उदासीन
शहरातील एका रुग्णाला स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल प्राप्त होऊन तीन दिवस झाले तरी सरकारी आरोग्य िवभाग अद्यापही उदासीनच आहे. यासंदर्भात करण्यात येणारी जनजागृती दिसून येत नाही. महानगरपालिकेचा आरोग्य िवभाग व िजल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने सदर आजाराबाबत नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी व त्याची लक्षणे सांगणे गरजेचे आहे.
रुग्णाची प्रकृती स्थिर
आमच्याकडे दाखल असलेल्या रुग्णास स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल पुण्याच्या प्रयोग शाळेने दिला आहे. अशा रुग्णांबाबत शासकीय यंत्रणेला कळवावे लागते. त्यानुसार आम्ही िजल्हा सिव्हिल सर्जन आणि महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कळवले आहे. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉ. राधेश्याम कुलकर्णी, विवेकानंद रुग्णालय, लातूर