आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur Government Servant Party Latest News In Marathi

निवडणूक कर्मचार्‍यांच्या जेवणावळीचा बागुलबुवा, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. शर्मा यांची खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - निवडणुकीसंदर्भात बैठकीला आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना साखरा येथील वन विभागाच्या रेस्ट हाऊसमध्ये देण्यात आलेले जेवण सरकारी निकषाच्या अधीन राहून दिले गेले असून ते खासगी उपाहारगृहापेक्षा स्वस्त होते. एकाच वेळी 200 व्यक्तींना जेवण देण्यासाठीची सोय शहरातील एकाही शासकीय विर्शामगृहात नसल्याने शहराबाहेरील वन विभागाच्या रेस्ट हाऊसचा वापर करण्यात आला होता. सारे काही पारदर्शी असताना काही दैनिकांत वास्तवाला विचारात न घेता त्याचे वृत्तांकन करण्यात आल्याची खंत जिल्हाधिकारी डॉ. विपिन शर्मा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीसंदर्भात अधिकार्‍यांची बैठक होती. ती जवळपास दिवसभर चालली. बैठकीला माझ्यासह पोलिस अधीक्षक व अधिकारी व कर्मचारी अशा 200 व्यक्ती उपस्थित होत्या. बैठकीतच आम्हा सर्वांना चहा व नाष्टा देण्यात आला होता. बैठक रात्री सव्वाआठपर्यंत चालली होती. त्यानंतर साखरा येथील रेस्ट हाऊसमध्ये सर्वांना जेवण देण्यात आले. निवडणुकीच्या कालावधीत जेवण, नाष्टा, चहा याचे पूर्वनियोजन एक महिन्यांपूर्वीच केले होते. साखरा येथील जेवण त्याचाच एक भाग होता. जेवणासाठी ई निविदा मागवण्यात आल्या होत्या. सर्वात स्वस्त व परवडणारी निविदाच स्वीकारण्यात आली होती.
सरकारी खर्चानुसारच बिल
विशेष म्हणजे जेवण शाकाहारी व महाराष्ट्रीय होते. असे असतानाही त्याला पार्टी म्हणणे व स्वत:च्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावणे कितपत योग्य आहे ? असा संतप्त सवालही जिल्हाधिकार्‍यांनी केला. सरकारी दराप्रमाणेच आम्ही जेवणाचे बिल अदा करणार आहोत, हे तुम्हीही पाहू शकता, असेही शर्मा म्हणाले.
शाकाहारी जेवण, पार्टी नव्हे
कांदा, मुळा, काकडी, चटणी, भाजी-पोळी, स्वीट हे शाकाहारी जेवणातील मेनू आहेत. तेच जेवण आम्ही घेतले व आमच्या सहकार्‍यांनाही दिले. ती पार्टी नव्हती, त्याला पार्टी म्हणणे हा विपर्यास आहे. विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी
हॉटेलातील खर्च 60 हजारांवर आला असता
एका व्यक्तीच्या जेवणासाठी शासनाची सव्वाशे ते 126 रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. लातूरमधील चांगल्या हॉटेलात पोटभर जेवण घ्यायचे म्हटले की किमान 250 ते 300 रुपये लागतात. बर्‍याच हॉटेलात थाळीची पद्धत नाही. 200 व्यक्तींचा विचार करता खासगी हॉटेलातला खर्च 60 हजारांवर जाणारा होता, तो आम्ही कसा व कुठून देणार? भाड्याने फर्निचर आणणे शासकीय खर्चात न बसणारे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील टेबल-खुच्र्या वापरण्यात आल्या होत्या. केटर्स मालकाने केवळ जेवण आणले होते.