आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलासराव देशमुखांच्या बाभळगावात 30 वर्षांनंतर ग्रामपंचायतीसाठी मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्ह्यातील ३७१ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी मतमोजणी झाली. अनेक गावांत सत्तापरिवर्तन झाले तर काही ठिकाणी जुन्याच नेत्यांच्या नेतृत्वाखाली नवे पॅनल िनवडून आले. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली. िवजयी झालेल्या उमेदवारंात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. िनकाल घोषित होताच िवजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली.

लातूर तालुक्यातील सिकंदरपूर ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी माधव गंभीरे यांच्या पॅनलचा पराभव करून त्यांच्या विरोधकांचे पॅनल बहुमतात आले. कातपूर येथे लालासाहेब चव्हाण यांची अनेक वर्षांपासून सत्ता होती. या वेळी त्यांचा सपशेल पराभव झाला. गातेगाव ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच किशोर माळी यांच्या पॅनलचा पराभव झाला. तेथे मुन्ना खोसे, वीरसेन भोसले यांच्या नेतृत्वातील पॅनलने ११ पैकी जागा मिळवून बहुमत प्रस्थापित केले. चिखुर्डा येथे मात्र रवी काळे यांनी ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. काडगाव येथे गोविंद बोराडे यांनी तिसऱ्यांदा आपले वर्चस्व ग्रामपंचायतीमध्ये निर्माण केले आहे.

निलंगा तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या औराद शहाजनीमध्ये प्रस्थापितांना धक्का बसला. तेथे भाजपप्रणीत कार्यकर्त्यांची सत्ता होती. आता माजी सरपंच मोहन भंडारे यांच्या पॅनलने विजय मिळवून ग्रामपंचायत काँग्रेसच्या बाजूने खेचून आणली. कासारशिरसी या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये राजकुमार चिंचनसुरे यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये बहुतेक गावातून मतदारांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला आहे. चाकूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नळेगावमध्ये रामराव बुदरे यांच्या नेतृत्वातील पॅनलने १२ जागा मिळवून स्पष्ट बहुमत संपादन केले. मात्र, बुदरे यांच्या पॅनलचे प्रमुख अमर पाटील हे पराभूत झाले आहेत. यापूर्वी नळेगाव ग्रामपंचायतीमध्ये अनिल चव्हाण यांच्या पॅनलची सत्ता होती. या वेळी त्यांच्या पॅनलला अवघ्या जागा मिळाल्या आहेत.

औसा तालुक्यातील उजनी ग्रामपंचायतीमध्ये १५ पैकी जागा मिळवून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नारायण लोखंडे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. खरोसा ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे भीमाशंकर डोके यांनी १७ पैकी १७ ठिकाणी विजय मिळवून ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय कोळपे यांच्या उंबडग्यात तरुणांनी स्थापन केलेल्या जय हनुमान पॅनलने त्यांचा पराभव केला. नागरसोगा येथे औसा पंचायत समितीच्या सभापती अनिता सूर्यवंशी यांनी ११ पैकी ठिकाणी विजय मिळवून आपली सत्ता कायम ठेवली.

गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व
गेवराई - तालुक्यातील१२ पैकी आठ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या गटाकडे आल्या असून यातील सात ग्रामपंचायती आमदार अमरसिंह पंडित गटाच्या आहेत. तीन ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. सुरेश हात्ते यांनी तलवाडा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. येथील तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीसाठी तहसीलमध्ये सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. आठ फेऱ्यांत केवळ दोन तासांत दुपारी निकाल जाहीर करण्यात आला. तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या ९७ जागांसाठी एकूण २३६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कुंभारवाडी, डोईफोडवाडी, तळेवाडी, जव्हारवाडी, वंजारवाडी, गोविंदवाडी, डोईफोडवाडी, गढी, चव्हाणवाडी या ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे आल्या असून यातील सात ग्रामपंचायतींवर आमदार अमरसिंह पंडित गटाचे वर्चस्व प्रस्थापित झालेले आहे. भाजप गटाकडे पांढरवाडी, चोपड्याची वाडी, मुळुकवाडी या ग्रामपंचायती आलेल्या आहेत. मतमोजणीसाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी काम पाहिले.

बाभळगावात दाेन जागांवर विरोधक
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बाभळगावात ३० वर्षांनंतर ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. तेथे २ जागा बिनविरोध आल्या होत्या. आठ जागांसाठी मतदान झाले. त्यापैकी दोन ठिकाणी अामदार अमित देशमुख विरोधी पॅनलचे उमेदवार विजयी झाले. एका वाॅर्डात उमेश गायकवाड, नूर सय्यद या दोघांना समान मते पडली असता टॉसमध्ये देशमुख पॅनलचे सय्यद विजयी झाले.
बातम्या आणखी आहेत...