आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगा उलटा फडकवणाऱ्या सरपंचावर गुन्हा, लातूरमधील हंगरगा ग्रामपंचायतीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - स्वातंत्र्याच्या ७०व्या वर्धापनदिनी निलंगा तालुक्यातील हंगरगा ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज उलटा फडकवल्याप्रकरणी सरपंच अंबादास जाधव यांच्याविरुद्ध अखेर आैराद शहाजानी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंगरगा येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ग्रामपंचायत कार्यालयावर तिरंगा ध्वज उलटा फडकवण्यात आला.  ही बाब लक्षात येताच ध्वज खाली उतरवून पुन्हा सन्मानपूर्वक चढवण्यात आला होता. ही घटना घडून तीन दिवस उलटले तरी पोलिस दखल घेत नव्हते.  माध्यमांना याची माहिती कळताच गुरुवारी रात्री उशिरा याप्रकरणी संजय सूर्यवंशी या ग्रामस्थाच्या फिर्यादीवरून सरपंच अंबादास जाधव यांच्याविरुद्ध कलम २ राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंधक अधिनियम १९७१ अन्वये आैराद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...