आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता होण्यासाठी लातूरचे योगदान मोलाचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर -अभियांत्रिकीत यायची आवड नव्हती. वडिलांच्या इच्छेखातर हे क्षेत्र निवडावे लागले. क्षेत्र निवडले तरी मन अभिनयाच्या प्रांतातच होते. कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला पंजाबी नायक जोगेदरसिंग आले होते. त्यांच्या थाटाने व झालेल्या सन्मानाने भुरळ घातली अन् सिनेसृष्टीत जाण्याचा माझा निश्चय अधिक पक्का झाला. अभिनेता म्हणून आकाराला येण्यासाठी इथल्या वास्तूने अन् या शहराने दिलेले योगदान मी नाकारू शकत नाही, अशी कृतज्ञता रविवारी प्रसिद्ध अभिनेते तथा पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी गिरीश कुलकर्णी यांनी
व्यक्त केली.
संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. एम. पी. सलगरे होते. तंत्रनिकेतनच्या पहिल्या विद्यार्थिनी सुनीता संचेती यांचे मनोगत त्यांच्यातील जिद्द सांगून गेले. सूत्रसंचालन संजय जेवरीकर यांनी केले.