आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्पना गिरी खून प्रकरण; आरोपींच्या अर्जावर युक्तिवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - येथील काँग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी यांच्या खून प्रकरणातील तिघा आरोपींना गुन्ह्यातून वगळले जावे म्हणून आरोेपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या दोषमुक्ती अर्जावर (डिस्चार्ज पिटिशन) येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश साधना शिंदे यांच्या न्यायालयात शुक्रवारी युक्तिवाद करण्यात आला. यावरील निकाल राखून ठेवून पुढील तारीख १६ जानेवारी अशी देण्यात आली आहे.

सरकार पक्षाच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांनी घटनाक्रम व त्याच्या विविध तारखा सांगत अारोपींविरुद्ध सकृतदर्शनी पुरावा असल्याने त्यांना दोषमुक्त करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप निश्चित करावेत, असा युक्तिवाद केला. आरोपी विक्रमसिंह दत्तूसिंह चव्हाण, कुलदीप नागूसिंग ठाकूर व सुवर्णसिंग ऊर्फ श्रीरंग किशनसिंग ठाकूर यांची बाजू मांडताना आरोपी एकत्र दिसणे हा खुनाच्या कटाचा पुरावा होऊ शकत नाही. शिवाय त्यांच्यात काय बोलणे झाले? यालाही कसलाच पुरावा नसल्याने आरोपींना दोषमुक्त करावे, असा युक्तिवाद अॅड. मोहन जाधव व अॅड. अभय ओसवाल यांनी केला. निकालाबाबतची उत्सुकता, अॅड. उज्ज्वल निकम यांची उपस्थिती आदींमुळे न्यायालयात गर्दी होती.