आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरचे आमदार अमित देशमुखांना औरंगाबाद खंडपीठाने बजावली नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूर शहर विधानसभा निवडणुकीत आमदार अमित देशमुख यांनी आयोगाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याप्रकरणी त्यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. शिवाय २४ एप्रिलपर्यंत हजर राहून म्हणणे मांडण्याचे नोटिशीत नमूद केले आहे.


निवडणुकीतील अन्य एक उमेदवार अॅड. अण्णाराव पाटील यांनी खंडपीठात ‘इलेक्शन पिटिशन’ दाखल केले आहे. ही याचिका न्यायमूर्ती नलावडे यांनी स्वीकारून नोटीस बजावली आहे. २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा असताना देशमुख यांनी २१ लाख रुपये खर्च झाल्याचे आयोगाकडे सादर केले आहे; परंतु त्यापेक्षा अधिक खर्च झाल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
देशमुख यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी लातूरच्या टाऊन हॉल मैदानावर सभा घेतली होती. या सभेचा खर्च त्यांनी ३ लाख ८० हजार रुपये दाखवला आहे; परंतु आयोगाने प्रचारादरम्यान कोणत्या साधनांचा खर्च किती आहे, याचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार प्रचार सभेवर ३२ लाख रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट होते, असा दावा याचिकाकर्ते पाटील यांनी केला आहे. याच प्रचारसभेचे चित्रीकरण पाहून आयोगाने अधिक खर्च झाल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती, असेही याचिकेत म्हटल्याचा दावा केला आहे.