आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर-मुंबई रेल्वेचा प्रश्न सुटेना; नांदेडकर नरमले !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- लातूर-मुंबई गाडी 15 ऑगस्टपर्यंत नांदेड येथून सुरू करावी, अशी आग्रही मागणी करतानाच या मागणीच्या पूर्ततेसाठी नांदेड-लातूर संघर्ष पेटता कामा नये, अशी संयमी भूमिका शनिवारी विश्रामगृहात झालेल्या सर्वपक्षीय सभेत घेण्यात आली. लातूरकरांचे मन वळवण्यासाठी शिष्टमंडळ लातूरला पाठवण्याचा व त्यानंतर एक शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांच्या भेटीला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

रेल्वे अंदाजपत्रकात लातूर-मुंबई रेल्वे नांदेडपर्यंत वाढवण्याला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. या गाडीचे वेळापत्रकही जाहीर झाले, परंतु लातूरकरांनी विरोध केल्याने ही गाडी मात्र अद्यापही लातुरातच अडकून पडली आहे. ही गाडी त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी शनिवारी सर्वपक्षीय सभा विश्रामगृहात पार पडली. खासदार भास्करराव पाटील खतगावकर, रेल्वे संघर्ष समितीचे सचिव सुधाकरराव डोईफोडे, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, वसंतराव चव्हाण, जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.

मंत्र्यांच्या कानपिचक्या
लातूर- मुंबई-लातूर एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेण्यावरून शिष्टमंडळे येत असल्याने रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे वैतागले होते. त्यांनी शिष्टमंडळांना असे निवेदने देऊन आणि आंदोलने करून प्रश्न सुटत नसल्याच्या कानपिचक्या दिल्या होत्या. आंदोलकांनी सामंजस्याने तोडगा काढावा, अशी सूचना त्यांनी केली होती. लातूर आणि नांदेड या शेजारी जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचेच खासदार असतानाही परस्परविरोधी निवेदने येतातच कशी, असा प्रश्न खरगे यांनी केला होता. त्यामुळेच तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.