आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur Nanded New Railway Track Granted In Railway Budget 2016

लातूर-नांदेड सर्वेक्षण झालेला नवा मार्ग होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंददायक बातमी दिली आहे. गेल्या वर्षी सर्वेक्षण झालेल्या लातूर ते नांदेड या नव्या मार्गाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी १५६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २४ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्याचे सर्वेक्षणही पूर्ण झाले असून त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे अद्याप सुपूर्द करण्यात आलेला नाही. लातूर ते गुलबर्गा या १४८ किलोमीटरच्या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २२ लाख २० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर लातूर रोड ते बोधन या १३० किलोमीटरच्या नव्या मार्गाचेही सर्वेक्षण होणार अाहे. या मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने १९ लाख ५ हजार रुपये मंजूर केले आहेत.

सर्व तालुके जोडतील
तिन्ही मार्गाला मंजुरी मिळाली तर लातूर जिल्ह्यातील सर्व तालुके रेल्वेच्या नकाशावर येणार आहेत. लातूर-नांदेड मार्गावरील चाकूर आणि अहमदपूर हे तालुके रेल्वेने जोडले जातील, तर लातूर-गुलबर्गा मार्गावर औसा, निलंगा हे तालुके जोडले जातील. हाच मार्ग पानगावपर्यंत आणावा. - शिवाजी नरहरे, जिल्हाध्यक्ष, म.ज.वि.प.

लातूर ते नांदेड या नवीन मार्गासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले आहेत. हा मार्ग झाल्यास उत्तर आणि दक्षिण भारताला जोडल्या जाणाऱ्या गाड्यांचे मोठे अंतर वाचणार आहे. त्यामुळे हा मार्ग पूर्ण करवून घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. - सुनील गायकवाड, खासदार, लातूर

‘रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेला हा आजवरचा सर्वात निराशाजनक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाने मराठवाडा आणि विदर्भासाठी काहीच ठोस सुधारणा दिल्या नाहीत. नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासदार अशोक चव्हाण आणि मी रेल्वे सुधारणाबाबत महत्त्वपूर्ण मागण्या केल्या होत्या. त्यांची दखलही घेण्यात आली नाही, ही बाब गंभीरच नाही, तर मराठवाडा व विदर्भाच्या रेल्वे विकासाला खीळ घालणारी आहे. - राजीव सातव, खासदार, हिंगोली.