आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीपची टेम्पोसह समोरून येणाऱ्या क्रुझरला धडक; 7 जण ठार, १३ जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूररोड रेल्वेस्थानकावर उतरलेले प्रवासी घेऊन लातूरकडे येत असलेल्या क्रुझरने रस्त्याच्या कडेला लावलेल्या टेम्पोसह समोरून येणाऱ्या दुसऱ्या क्रुझर जीपला धडक दिली. यामध्ये जण जागीच ठार झाले असून १३ जण जखमी झाले आहेत. लातूर-नांदेड रोडवरील कोळपा गावाजवळ मंगळवारी पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. जखमींवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
विवेकानंद पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सांगितले, लातूर रोड (ता. चाकूर) येथील रेल्वेस्थानकात मंगळवारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास आलेल्या रेल्वेतून काही प्रवासी उतरले. त्यातील नऊ प्रवाशांना घेऊन एक क्रुझर लातूरकडे निघाली. ती साडेचार वाजता कोळपा गावाजवळ पोहोचली. त्या वेळी अंधारामुळे चालकाला पुलाच्या कडेला उभारलेला आयशर टेम्पो दिसला नाही. त्यामुळे क्रुझरची टेम्पोला जोराची धडक बसली. याच वेळी समोरून येत असलेल्या दुसऱ्या क्रुझर वाहनालाही धडक दिली. या अपघातात लातूर रोडहून आलेल्या गाडीचे अवशेष अक्षरश: हवेत उडाले. गाडीचा अगदी चेंदामेंदा झाला. त्यातील सात जण जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. दुसऱ्या क्रुझरमधील नऊ जण जखमी झाले. सर्व जखमींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
अपघातातील मृतांची नावे : विजयतुकाराम पांदे (३०, रा. दापूर, ता. सिन्नर, जि. नाशिक), तुकाराम ज्ञानोबा दळवे (३५, रा. दापेगाव, ता. औसा), उमाकांत सोपान कासले (४०), मीना उमाकांत कासले (३८, दोघेही रा. रेणापूर नाका, लातूर), शुभम शरद शिंदे (२४, रा. बेलपिंपळगाव, ता. जि. अहमदनगर), मनोज चंद्रकांत शिंदे (२५, रा. वैशालीनगर, बाभळगाव) दत्तू बळीराम शिंदे (३५, रा. हिंपळनरी, ता. मुखेड, जि. नांदेड). 
 
बातम्या आणखी आहेत...