आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur News About Assistant Sub Inspector Yunus Sheikh

मुस्लिम पोलिसावरील हल्‍ल्‍यानंतर काँग्रेसने म्‍हटले- देशात एका विचाराची दहशत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - रेणापूर तालुक्यातील पानगावमध्ये शिवजयंती दिनी झालेल्या पोलिस मारहाण प्रकरणामुळे सध्‍या चांगलेच राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालक आणि गृहराज्यमंत्र्यांना पानगावला भेट देण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय हा हल्ला वैयक्तिक नव्हता तर, पोलिस दलावरील हल्ला होता, असे हल्ले खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
कोणी काय म्‍हटले?
- राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक म्‍हणाले - लातूरची घटना ही अत्‍यंत दुर्दैवी आहे. नारेबाजी करण्‍याचे सांगणे व मारहाण करण्‍याचा जमावाला अधिकार नाही.
- भाजपा नेते सायना एनसी - "ही घटना निषेधार्ह आहे. आमचे सरकार दोषींविरोधात कारवाई करत आहे."
- काँग्रेसचे नेते संजय निरुपम -"महाराष्ट्रासह देशभरात एका विचारधारेची दहशत वाढत आहे. लातूरची घटना हा त्‍याचाच परिणाम आहे."
पोलिस निरीक्षक एल.व्ही.राख यांची बदली
पोलिसांना झालेल्या मारहाणीनंतर रेणापूरचे पोलिस निरीक्षक एल.व्ही.राख यांची बदली करण्यात आली आहे. काल रात्री त्यांना यासंदर्भातील आदेश देण्‍यात आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस आमदार अमित देशमुख पानगावात जाऊन युनूस शेख यांची भेट घेणार आहेत.
पोलिसांना मारहाण, काय आहे प्रकरण..
- शिवजयंतीनिमित्त 18 फेब्रुवारीला पानगावमधील काही तरुणांनी आंबेडकर चौकात भगवे झेंडे लावण्‍यास सुरूवात केली.
- तरूण झेंडे लावत असलेले ठिकाण अत्‍यंत संवेदनशील होते.
- कोणताही वाद निर्माण होऊ नये म्‍हणून पोलिसांनी या युवकांची समजूत काढून त्यांना परत पाठवले.
- शिवजयंतीच्‍या दिवशी आंबेडकर चौकात पुन्‍हा गर्दी झाली. घोषणाबाजीसह येथे झेंडे फडकावले जाऊ लागले.
- वाद होऊ नये म्‍हणून पोलिस शिपाई युनूस शेख आणि आवसकर यांनी जमावाला अटकाव केला.
- जमावाने थेट पोलिसांवर हल्ला करुन त्यांना मारहाण केली. यामध्‍ये दोन पोलिस जखमी झाले.
पोलिसांच्‍या माहितीनुसार..
- रेणापूर तालुक्यातील पानगावमधील आंबेडकर चौक संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो.
- 19 फेब्रुवारीच्या मध्यरात्री मंडाळाचे दोन डझनहून अधिक तरुण आंबेडकर चौकात भगवा फडकवण्यासाठी आले होते.
- या परिसरात भगवा फडकवण्यास पोलिसांनी मनाई केली. तेव्‍हा दुस-या दिवशीही चौकात तरूण जमले.
- जमावाने पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. तरुणांच्या गटाने पोलिसांना माराहाण केली. दगडफेकही केली.
- पोलिसांनी आजपर्यंत 16 लोकांना अटक केले आहे. त्‍यामध्‍ये एका अल्‍पवयीन मुलाचा समावेश आहे.
युनूस शेख काय म्‍हणाले..
- हॉस्पिटलमध्‍ये उपचार घेत असलेले पोलिस शिपाई युनूस शेख म्‍हणाले, जमावाने घेरुन मला मारपीट केली.
- जय शिवाजी, जय भवानीचे असे नारे लावण्‍यास मला सांगितले.
- मी जमावाची समजूत घालण्‍याचा प्रयत्‍न केला पण कोणीच ऐकत नव्‍हते.
- माझ्या हाती भगवा देऊन जबरीने ओढून मला मिरवणूकीत नेण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, VIDEO- युनूस यांच्‍या हाती भगवा देऊन त्‍यांना मिरवणूकीत फिरवले..