आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur News In Marathi, Model Code Of Coduct, Lok Sabha Election

लातूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित नसताना आचारसंहितेचा गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - उदगीर तालुक्यातील हाळी गावाजवळ मंगळवारी एका शेतक-यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. हाळी ते खरबवाडी या रस्त्यावर यशवंत माने यांची शेती आहे. गोठा पावसाने भिजू नये म्हणून त्यांनी बाजारातून वापरून काढून टाकलेले होर्डिंग आणले होते.

स्वस्तात मिळणारे बॅनर शेतकरी सर्रासपणे वापरतात. या शेतक-याने वापरलेले बॅनर भाजपचे आहे. त्यामुळे माने यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे माने हे शेतकरी असून त्यांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. तसेच लातूर लोकसभा मतदारसंघात अद्याप भाजपचा उमेदवारही जाहीर झालेला नाही. याबाबत जिल्हाधिकारी विपीन शर्मा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


आता द्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचीही माहिती
लोकसभा निवडणूक लढवणा-या उमेदवारास फक्त आपल्या बँक अकाउंटचीच नव्हे, तर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, गुगल चॅट अशा सोशल नेटवर्कवरील अकाउंटची माहिती देणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे या वेळेसच्या निवडणुकीचा प्रचार जसा सोशल नेटवर्कभोवती फिरतो आहे तशी निवडणुकीची प्रक्रियाही सोशल मीडियाभोवतीच फिरू लागली आहे. आतापर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकांपेक्षा या वेळेसची निवडणूक तशी सर्वार्थाने वेगळी आहे.