आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur News In Marathi, Shivraj Patil Chakurkar, Divya Marathi

चाकूरकरांच्या सूनबाई राजकारणात उतरणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, यासाठी पाटील समर्थकांनी जोरदार फीलि्डंग लावली आहे. मात्र, अद्याप चाकूरकर परिवाराचा याबाबत नरि्णय झालेला नाही. मात्र अर्चनाताई राजकारणात अाल्यास त्यांना लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

राज्यमंत्री अमित देशमुख यांनीही पाटील यांच्या राजकारण प्रवेशाचे स्वागत केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांना स्वत:चा शहर मतदारसंघ सोडण्याचीही तयारी दर्शवली आहे.
८० वर्षे वय असलेले शिवराज चाकूरकर सध्या निवृत्तीच्या मन:स्थितीत आहेत.
लातूर जलि्ह्यात लिंगायत समाज मोठ्या संख्येने असून चाकूरकरांच्या रूपाने या समाजाला मोठा आधार होता. मात्र अाता चाकूरकर िनवृत्त होत असताना आपला एक कणखर प्रतिनिधी राहावा, अशी लिंगायत समाजातील धुरीणांची मानसिकता आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात चाकूरकरांना अर्चना पाटील यांच्या राजकारण प्रवेशाबाबत छेडले असता त्यांनी ‘मला कुणी विचारले तर मी नाही म्हणणार नाही’, असे सूचक उत्तर िदले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चाकूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात स्वत: अर्चना यांनी ‘घरच्यांनी परवानगी दिली तर आपण राजकारणात येऊ’ असे वक्तव्य केले होते. लातूर शहरचे प्रतिनििधत्व करणारे राज्यमंत्री अमित देशमुख यांना पत्रकारांशी याबाबत विचारले असता त्यांनी आपण पाटील यांच्या निर्णयाचे स्वागतच करू, असे स्पष्ट केले आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांना लातूर शहरमधून उमेदवारी दिली तरी आपली हरकत नाही, असे ते म्हणाले.

लाइफकेअरची उभारणी
अर्चना पाटील डॉक्टर आहेत. मात्र, त्यांनी रूढार्थाने वैद्यकीय व्यवसाय केलेला नाही. माहेर असलेल्या उदगीर भागात त्यांनी लाइफकेअर या रुग्णालयाची उभारणी केली. सीमाभागात उभारलेल्या या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयामुळे परिसरातील रुग्णांची सोय झाली आहे. मुंबई, पुण्यात होणाऱ्या शस्त्रक्रिया उदगीरमध्ये होत आहेत. दिल्लीच्या वर्तुळात आपले वजन राखून असलेल्या अर्चना पाटील यांचा लातूरमधला जनसंपर्कही तितकाच दांडगा आहे.