आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur Usmanabad Solapur Vel Amavsaya Celebration

‘ओलगे ओलगे सालम पोलगे’ने गुंजले शिवार, काळ्या आईप्रति बळीराजाची कृतज्ञता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - खरिपाने केलेला घात, रब्बीने सोडलेली साथ, उजाड राने अन् उजाड मने.. नियतीने माथी मारलेले हे वास्तव उगाळत न बसता जन्मभर आपल्यासह आपली चिल्लीपिल्ली अन् जित्राबाला घास देणाऱ्या काळ्या आईच्या कौतुकासाठी रविवारी लातूरच्या बळीराजाने मोठ्या हिमतीने कंबर बांधली. कारभारणीसमवेत खोपीतल्या लक्ष्म्यांचे त्याने मोठ्या भक्तिभावाने पूजन केले. सर्वांच्या कुशल -मंगलाची अन् धनधान्य संपन्नतेची कामनाही तिच्याकडे केली. "ओलगे ओलगे सालम पोलगे' या घोषाने शिवारे गुंजली. निमित्त होते जिल्ह्यातील कृषी संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेल्या वेळअमावास्येचे.
१५ दिवसांपासूनच या सणाचे वेध शेतकऱ्याला लागले होते. बहरलेल्या हरभऱ्याची, शेंगांनी लगडलेल्या तुरीची, पिवळ्या- केशरी रंगातील करडईच्या फुलांची पार्श्वभूमी या वेळअमावास्येला नव्हती. पावसाअभावी हरवलेले हे हिरवेपण शेतकऱ्यांसह सर्वांच्या मनाला चटका लावणारे होते. भज्जीसाठी डहाळा अन् तुरीच्या शेंगांची चणचण भासावी अशी वेळ पहिल्यांदाच आल्याचे शेतकरी नामदेव शालिवाहन यांंनी सांगितले. असे असले तरी शेतकऱ्यातील काळ्या आईप्रतीची भक्ती कमी झाली नाही. भल्या सकाळी स्नान ओटापून त्याने शेतात खोप बनवली. त्यात लक्ष्म्यांची प्रतिष्ठापना केली. कारभारणीसमवेत पूजन झाले. कारभारणीनेही त्याच्या पाठीवर बाजरीचा रोडगा मारला. "ओलगे ओलगे सालन पोलगे'च्या घोषात सर्वांनीच लक्ष्मीपूजन केले. गावशिवारातील देवीदेवतांचीही पूजा झाली. मित्रपरिवारासह पंगती रंगल्या. सायंकाळी पुढल्या वेळअमावास्येची आस मनात बांधून सर्वांनीच घराचा रस्ता घरला.

पुढील स्लाइडमध्ये, काय आहे वेळअमावास्या