आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur Zilha Parishad News In Marathi, Divya Marathi

झेडपीचा दसरा निघाला, पण साहेब आलेच नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - साहेबांच्या आगमनासाठी सर्वच जण आतुर अन् गंभीरही होते. त्यांच्या स्वागतासाठी झेडपीचा परिसर स्वच्छ अन् सुंदर झाला होता. ते इमारतीत आल्यास त्यांच्या ओठी या खटाटोपाप्रती कौतुकाचे चार शब्द यावेत म्हणून जो तो आपापल्या परीने राबलाही होता. तथािप साहेबांची गाडी मुंबईतच थांबली. ते येवोत वा ना येवोत, परंतु त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अधिकारी-कर्मचा-यांच्या समन्वयातून जिल्हा परिषदेचा दसरा मात्र िनघाला.

यशवंत पंचायत राजमध्ये देशात अव्वल ठरलेल्या लातूर झेडपीची स्वच्छतेप्रती सजगता अन् गंभीरता तसा िचंतनाचा िवषय. फार तर उत्सवाच्या उजळणीपुरतेच ितचे स्वरूप. परंतु ग्रामविकासचे प्रधान सचिव व्ही. गििरराज यांच्या संभाव्य दौ-याने या ओळखीला छेद दिला. सोमवार ते बुधवार असा त्यांचा दौरा होता. साहेबांच्या पसंतीला सारे काही उतरावे म्हणून सर्वांनीच मनोभावे योगदान दिले. ब-याच वेळा कामाच्या वेळेतही न दिसणारे काही जण सुटीच्या दिवशीही कार्यालयात कार्यमग्न दिसून आले. धुळीत जखडलेल्या फायलींना नवे कव्हर िमळाले. कोप-यांना लख्ख आरसे बसवण्यात आले. दारे-िखडक्यांना पडद्यांनी सजवण्यात आले.
कार्यालयात कुठेही धूळ दिसणार नाही याची कटाक्षाने काळजी घेण्यात आली होती. साहेबांची गाडी पंचायत समिती, प्राथिमक आरोग्य केंद्र वा एखाद्या शाळेतही वळू शकते त्यामुळे तिथेही कौतुकाचा ‘वन्स मोअर’ िमळावा याबाबतही प्रशासनाने कुठलीही कसर सोडली नव्हती. गटविकास अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व वैद्यकीय अधिका-यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना आपापली कार्यालये स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरू होती. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाने अनेक जण कामािनमित्त झेडपीत आले. कार्यालयातही गेले. सर्व खुर्च्यांत कर्मचारी, त्यांचे गणवेश, टेबलांवर फ्लाॅवरपाॅट, फुलांच्या कुंड्यांनी सजलेली कार्यालये हे सारे पाहून आपण चुकून दुस-याच इमारतीत आलो तर नाही? अशी शंका त्यांना आली तर त्यात नवल ते कोणते.

झेडपी लख्ख अन् टकाटक
साहेब येणार म्हणून सारेच जण वाट पाहत होते, परंतु ते अन् त्यांचा निरोपही आला नाही. ‘िनवडणुकीच्या कामामुळे त्यांना फुरसत िमळाली नसेल,’ असा अंदाज दिवसभर बांधत कर्मचा-यांनी आपापले कामकाज आटोपले. साहेब भलेही आले नसतील, परंतु त्यांच्या नावे िजल्हा परिषद ‘लख्ख’ अन् ‘टकाटक’ झाली हेही नसे थोडके.