आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या अंत्यदर्शनाची शक्यताही झाली धुसर; अमेरिकेतच अंत्यसंस्काराचा डॉक्टरांचा अभिप्राय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेल्या सुनील बिरादार या तरुणाचा आठ दिवसांपूर्वी तेथे  बुडून मृत्यू झाला. मात्र अमेरिकेहून त्याचा मृतदेह आठ दिवसांनंतरही आला नाही.   डोळ्यांत प्राण एकवटून ते सुनीलच्या कलेवराची प्रतीक्षा करीत आहेत.  सुनीलचा मृतदेह लवकर मिळावा यासाठी पालकमंत्री, खासदार आणि जिल्हा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला. तरीही परराष्ट्र खात्याचे अधिकारी आणि अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवल्यामुळे जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे.  किमान मुलाचा अंत्यविधी तरी वेळेत व्हावा यासाठी त्याचे पालक आगतिक झाले आहेत. दरम्यान, सुनीलचा मृतदेह कुजला असल्याने त्यावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार जाण्याची शक्यता असून त्याच्या पालकांना त्याचे अंत्यदर्शन मिळणेही अवघड आहे. 

उदगीर तालुक्यातील हैबतपूर येथील बालाजी बिरादार या शेतकऱ्याचा मुलगा सुनील गुणवत्तेवर अमेरिकेच्या विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवला होता.  चार दिवसांपूर्वी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी बालाजी बिरादार यांच्याशी संपर्क साधून त्यांचा मुलगा पाण्यात बुडून मरण पावल्याचे सांगितले होते. त्यामुळे बालाजी यांनी  इतरांच्या माध्यमातून  आ. सुधाकर भालेराव, खा. सुनील गायकवाड आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांशी संपर्क साधला.   जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले आणि परराष्ट्र मंत्रालयाशी इमेलद्वारे संपर्क साधला. परंतु परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळले नाही.  सुनीलचा मृतदेह भारतात आणण्यासाठी लागणारा खर्च करण्याची त्याच्या कुटुंबियांची अर्थिक स्थिती नाही.
 
मृतदेह कुजला 
सुनीलचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे. रासायनिक प्रक्रिया करूनही तो विमानाद्वारे भारतात पाठवण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे तो भारतात न आणता अमेरिकेतच त्यावर अंत्यसंस्कार करावे लागतील, असा अभिप्राय अमेरिकेतील डाॅक्टरांनी दिल्याने सुनीलवर तेथेच अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...